Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्ष पदी निवड

Jul 3, 2022

महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी अखेर राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी मैदानात होते. या लढतीत नार्वेकर यांनी बाजी मारली. आता महाराष्ट्राच्या विधिमंडळात सासरे आणि जावयांचं ‘राज्य’ असणार आहे. कारण विधानसभा आणि विधानपरिषद या दोन सभागृहाच्या ‘चाव्या’ आता सासरे आणि जावयाच्या हाती आल्या आहेत. विधानसभेत जावई राहुल नार्वेकर तर विधानपरिषदेत त्यांचे सासरे रामराजे नाईक निंबाळकर हे सध्या विधान परिषदेचे सभापती आहेत.

नार्वेकर हे राज्याच्या आणि देशाच्या इतिहासातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष ठरले आहेत. ते राज्य विधानसभेचे 20 वे अध्यक्ष आहेत. आज झालेल्या विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीत शिरगणती केल्यानंतर नार्वेकर यांना बहुमतापेक्षा जास्त 164 मतं मिळाली. तर राजन साळवी यांना 107 मतं मिळाली. समाजवादी पक्ष आणि एआयएमचे आमदार या मतदानात तटस्थ राहिले. एकूण तीन आमदार तटस्थ राहिले. अशा पद्धतीनं नार्वेकर मोठ्या मतांनी विजयी झाले. आता अध्यक्षांची भूमिका आता महत्वाची असणार आहे. कारण उद्या शिंदे-फडणवीस सरकारची बहुमत चाचणी देखील पार पडणार आहे.

अजून बातम्या वाचा..

रेल्वे मध्ये सुरु असलेले खाजगीकरण बंद करण्यासाठी प्रयत्न करावेत – खा.संजय राऊत यांना निवेदन !

रेल्वे मध्ये सुरु असलेले खाजगीकरण बंद करण्यासाठी प्रयत्न करावेत, मनमाड केंद्रीय रेल्वे इंजिनिअरिंग...

read more
एस.सी.एस.टी.रेल्वे एम्प्लाईज असोसिएशनच्या केंद्रीय अध्यक्ष व महामंत्री यांची बिनविरोध निवड !

एस.सी.एस.टी.रेल्वे एम्प्लाईज असोसिएशनच्या केंद्रीय अध्यक्ष व महामंत्री यांची बिनविरोध निवड !

ऑल इंडिया एस.सी.एस.टी.रेल्वे एम्प्लाईज असोसिएशनच्या केंद्रीय अध्यक्षपदी बी.के.बैरवा व केंद्रीय...

read more

मनमाड शहरात खासदार संजय राऊत यांच्या हस्ते विविध विकासकामांचा उद्घाटन सोहळा संपन्न….

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या हस्ते मनमाडला विविध विकासकामांचा उदघाटन सोहळा संपन्न झाला....

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]