loader image
[ays_poll id=7]

अखेर ठरलं: मंत्रिमंडळ विस्तार २० जुलै रोजी

Jul 16, 2022

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता स्थापन केल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर लागला असल्याचे कळते.मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, येत्या 20 जुलै रोजी मंत्रिमंडळ विस्तार होणार असून पहिल्या टप्प्यात दहा ते बारा मंत्र्यांना शपथ दिली जाणार आहे. यामध्ये एकनाथ शिंदे गट आणि भाजप अशा दोन्ही गटातील मंत्र्यांचा समावेश असणार आहे.
25 जुलैपासून राज्यात पावसाळी अधिवेशन आहे. त्यापूर्वी या दहा ते 12 मंत्र्यांना राज्याच्या कारभाराची आणि प्रश्नांची माहिती व्हावी. त्यामुळे 20 जुलै रोजी मंत्रिमंडळचा विस्तार असेल. 18 जुलै रोजी राष्ट्रपती पदाची निवडणूक आहे. त्यानंतर एकदिवसाच्या गॅपनंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. 20 जुलै रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिंदे गटातील पाच ते सहा मंत्र्यांना तर भाजपच्या सहा ते सात मंत्र्यांना शपथ दिली जाण्याची शक्यता आहे. पावसाळी अधिवेशाननंतर मंत्रिमंडळाचा मोठा विस्तार केला जाण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत 19 जुलैपर्यंत दिल्लीमधून सर्व बोलणी होतील. त्यानंतर 20 जुलै रोजी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.

अजून बातम्या वाचा..

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  पुणे - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनमाड...

read more
मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड, दि. २५ एप्रिल २०२५: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा...

read more
पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

दिनांक २२/०४/२०२५ रोजी जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाममधिल बैसरण येथे विदेश.देशभरातिल राज्यातून...

read more
.