loader image
[ays_poll id=7]

के.आर. टी. इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये चित्रकला स्पर्धा संपन्न

Jul 16, 2022

मनमाड येथील कवी रबिन्द्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि. तर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
शाळेत आयोजित केलेल्या या चित्रकला स्पर्धा कार्यक्रमासाठी इंडियन ऑइल कॉर्पो. लि. बॉटलिंग प्लांट तर्फे असिस्टेंट प्लान्ट मॅनेजर श्री. संजोग ए. पाटील, मॅनेजर श्री. मधुर धाका, श्री. समाधान पवार आणि श्री. राम आशिष चव्हाण, सचिन इमले हे उपस्थित होते, तर शाळेचे प्राचार्य श्री. मुकेश मिसर, मुख्याध्यापक श्री. दिपक व्यवहारे, संस्थेचे विश्वस्त श्री. वैभव कुलकर्णी, श्री. धनंजय निंभोरकर आणि श्री. मनोज छाबडा हे उपस्थित होते.

या चित्रकला स्पर्धेसाठी स्वच्छ भारत अभियान ही संकल्पना होती.
इयत्ता 1 ली ते 6 वी च्या शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित या स्पर्धेत शाळेतील एकूण 593 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि. तर्फे या विद्यार्थ्यांना रंगपेटी, कागद आणि इतर चित्रकला साहित्य पूरविण्यात आले. तसेच के जी विभागातील विद्यार्थियाना कैडबरी वाटप करण्यात आले.
याबरोबरच आय ओ सी तर्फे इयत्ता 8 वी, 9 वी आणि 10 वी च्या 13 ते 18 वयोगटाच्या विद्यार्थ्यांसाठी जिज्ञासा क्विज scholarship साठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यात आले.या प्रसंगी शाळेत वृक्षरोपण करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.