मनमाड-नांदगाव रोडवरील मालेगाव नाका येथे असलेल्या हिंदुस्थान पेट्रोल पंपावर उधारीचे पैसे मागितल्याचा राग आल्याने पंप मालकाला मारहाण करण्यात आल्याची घटना शहरात घडली.याप्रकरणी पंप मालक आलिद हाजी आरिफ गाजीयानी, राहणार मालेगाव यांनी मनमाड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून डिझेल विक्रीचे उधारीचे पैसे अब्दुल हमीद शेख राहणार हनुमान नगर मनमाड यांच्याकडे मागितले असता त्याचा राग येऊन शेख यांनी गाजियानी यांची दाढी ओढून काठीने मारहाण केली व दगड मारत दुखापत केली तसेच गाडीचे नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बघा व्हिडिओ – सह्याद्री सेवक गडकिल्ले संवर्धन संस्थेतर्फे अंकाई – टंकाई किल्ले येथे संवर्धन मोहीम संपन्न
मनमाड - छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूपासून रक्षण करण्यासाठी महाराष्ट्रातील गड किल्ल्याना ढाल...











