loader image
[ays_poll id=7]

मनमाड रोटरी क्लब पदग्रहण समारंभ संपन्न

Jul 22, 2022


सेवेला धर्म नसतो,तो मानवतेचा भाग असतो.आंतरराष्ट्रीय स्तरावर सेवा कार्य करणाऱ्या रोटरी क्लब या संस्थेच्या मनमाड येथील कार्यकर्त्यांनी रोटरी क्लबच्या माध्यमातून पर्यावरण रक्षण आणि प्लास्टिक बंदी समाजासाठी उपयुक्त असलेल्या उपक्रमांना बळ द्यावे.त्यासाठी विविध सेवाभावी उपक्रम राबवावे,असे आवाहन सेंट झेवियर सोसायटीचे रेव्ह.फादर लॉईड डॅनियल यांनी मनमाड रोटरी क्लबच्या पदग्रहण समारंभात मनोगत व्यक्त केले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सेवा कार्यात अग्रेसर असलेल्या रोटरी क्लबच्या मनमाड शाखेच्या नुतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ येथील पल्लवी मंगल कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. जळगांव रोटरी क्लबचे गनी मेमन,सेंट झेवियर्स सोसायटीचे रेव्ह. फादर लॉईड डॅनियल,रोटरी क्लब मालेगांवचे ज्येष्ठ सदस्य शिवनारायण काकाणी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत रोटरी क्लबचे नवे अध्यक्ष इंजि.स्वप्नील सुर्यवंशी व सचिव डॉ.सुमित शर्मा यांच्यासह नुतन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ थाटात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गनी मेमन यांनी सामाजिक कार्याची व्याख्या स्पष्ट करतांना समाजाचे विविध गरजूंना आवश्यक ते उपक्रम हाती घेण्याचे आवाहन केले.नवीन पदाधिकाऱ्यांसह नवीन सदस्यांचे यावेळी स्वागत करण्यात आले. तसेच यावेळी बोलतांना अध्यक्ष सुर्यवंशी यांनी रोटरी क्लब मनमाडच्या माध्यमांतून विविध उपक्रम राबविण्याचा मनोदय व्यक्त केला.शिवनारायण काकाणी यांनी मनमाड रोटरी क्लबच्या कार्याचा गौरव केला. मनमाड रोटरी क्लब ही सर्वात जुनी सेवाभावी संस्था असून या संस्थेने आतापर्यंत विविध उपक्रम निष्ठेने राबविले आहेत.रोटरी क्लब ही १०० वर्षापेक्षा जुनी संस्था आहे.महिला रोटरी क्लब देखील प्राधान्याने विविध उपक्रम राबवितात.आगामी काळात मनमाड रोटरी क्लबच्या नवीन टीमने पर्यावरण रक्षण,रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि शेती क्षेत्रांत लक्षणीय उपक्रम हाती घ्यावेत असे आवाहन काकाणी यांनी केले. याप्रसंगी विविध संस्था , संघटना व कार्यकर्त्यांनी नुतन अध्यक्ष स्वप्निल सुर्यवंशी,सचिव डॉ.सुमित शर्मा यांचा सत्कार केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुजितसिंग कांत आणि सुभाष गुजराथी यांनी केले.डॉ . सुमित शर्मा यांनी आभार मानले . राजकीय , सामाजिक , शैक्षणिक , सांस्कृतिक आणि सर्व स्थरांतील नागरीक , रोटरी क्लब सदस्य आदी यावेळी उपस्थित होते . महिला रोटरी क्लबतर्फे सौ.सेनेरिटा सुर्यवंशी व सौ.शर्मा यांनी मनोगत व्यक्त केले.मावळते अध्यक्ष भूषण शर्मा , खुशाल शर्मा यांनी गतवर्षी राबविलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला.


अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.