Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने आयोजित शालेय स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद

Jul 24, 2022

मनमाड : गेल्या 27 वर्षांपासून मनमाड शहरामध्ये स्वामी विवेकानंद व्याखानमालेसह विविध उपक्रमांचे आयोजन करून शहराचा सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील शालेय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ,या स्पर्धेस शहरातील सर्व शाळेंच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

शालेय विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक विकासाची वाटचाल सुकर व्हावी या हेतुने 5 वी ते 10 विच्या मनमाड मधील सर्व शाळेंच्या विद्यार्थ्यांसाठी वयोगटानुसार विविध विषयांच्या स्पर्धेचे आयोजन आज रविवार छत्रे हायस्कुल येथे करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये 5 वीच्या विद्यार्थ्यांसाठी भावगीत आणि देशभक्ती गीत , 6 वी हस्ताक्षर , 7 वी चित्रकला , 8 वी प्रश्नमंजुषा , 9 वी निबंध , 10 वी सामान्यज्ञान स्पर्धांचे विविध विषय विद्यार्थ्यांसाठी देण्यात आले होते .शहरातील अनेक शाळेतील विद्यार्थ्यांनी उपस्थित राहुन या शालेय स्पर्धेस उस्फुर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेमध्ये संख्यात्मक सहभाग जास्त असणाऱ्या शाळेला सन्मान चिन्ह देऊन आणि यशस्वी स्पर्धकांना पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

या शालेय स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संस्कृती संवर्धन समितीचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांनी परिश्रम घेतले.

अजून बातम्या वाचा..

१ जुलै पासून केंद्राने लागु केलेल्या कायद्याची पोलिस स्टेशनला अमलबजावणी गुन्हेगारांना बसणार जरब

१ जुलै पासून केंद्राने लागु केलेल्या कायद्याची पोलिस स्टेशनला अमलबजावणी गुन्हेगारांना बसणार जरब

  नांदगांव : मारुती जगधने इंग्रज काळातील कायद्यात केंद्र शासनाने बदल केला असून गत ७५ वर्षाहुन...

read more
राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

मुंबई, दि. २९: राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री...

read more
मिशन विधानसभा – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अर्थमंत्री अजित पवारांकडून घोषणा

मिशन विधानसभा – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अर्थमंत्री अजित पवारांकडून घोषणा

मुंबई, 28 जून : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे अर्थमंत्री...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]