loader image
[ays_poll id=7]

कॉमनवेल्थ गेम जिम्नॅस्टिक मध्ये मनमाडच्या सैफ तांबोळीची भारतीय संघात निवड

Jul 27, 2022

मनमाडच्या सैफ तांबोळीची कॉमनवेल्थ गेम जिम्नॅस्टिक या प्रकारात भारताच्या संघात निवड झाली असून त्याच्या या निवडीचे सर्व थरातून स्वागत होत आहे. इंग्लंड येथील बर्लिन्गम होणाऱ्या कॉमनवेल्थ गेमसाठी जिम्नॅस्टिक ही निवड झाली आहे. इंग्लडमध्ये बर्लिन्गम येथे गुरुवारी २८ तारखेपासून कॉमनवेल्थ गेम्स होणार आहेत. विशेष म्हणजे जिम्नास्टिक या प्रकारात महाराष्ट्राचा तो पहिला खेळाडू आहे.

इंग्लंड येथे होणाऱ्या कॉमनवेल्थगेमसाठी भारतीय संघाचे खेळाडू इंग्लंडला रवाना झाले आहेत. यात सर्व प्रकारच्या खेळाडूंचा समावेश आहे. तांबोळी हा भारतीय नेव्ही मध्ये कार्यरत आहे. इंग्लंड येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम मध्ये तो भारताचा प्रतिनिधित्व करणार आहे. नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथील सादिक तांबोळी यांचा सैफ हा मुलगा आहे. लहानपणापासूनच त्याला जिम्नॅस्टिकची आवड होती. या खेळाची आवड बघून तांबोळी यांनी त्याला पुढे मदत केली. याच खेळाच्या जोरावर सुरुवातीला विभाग, राज्य, आंतरराज्य त्यानंतर देशपातळीवर उत्कृष्ट कामगिरी केल्याने त्याला भारतीय नेव्ही मध्ये नोकरी मिळाली. नोकरी करत असताना त्याने आपला सराव सुरूच ठेवला. त्यामुळे त्याला कॉमनवेल्थ गेम साठी संधी मिळाली. कॉमनवेल्थ गेममध्ये पदक मिळवण्याची आशा त्याच्या प्रशिक्षकांनी व्यक्त केली आहे. कॉमनवेल्थ गेम मध्ये पदक मिळाले तर भविष्यात होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी देखील त्याची निवड होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातून इथपर्यंत कामगिरी करणाऱ्या सैफचे सर्वस्तरातुन कौतूक होत आहे.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.