loader image
[ays_poll id=7]

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे लोकशाहीर अण्णाभाऊसाठे जयंती ओपन लाईन शाखा च्या कार्यालयात साजरी

Aug 2, 2022

ओपन लाईन शाखा चे अध्यक्ष प्रदीप गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, झोनल कार्यकारिणी सदस्य विजय गेडाम, कंन्झुंमर्स को-ऑपरेव्ह सोसायटी लिमिटेड मनमाड चे सचिव व कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, अतिरिक्त सचिव रमेश पगारे बहुजन युवक संघ चे कोषाध्यक्ष साईनाथ लांडगे आदी उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ मध्ये मोठे योगदान दिले आहे.
पण आज ची परिस्थिती ही वेगळी आहे.महाराष्ट्राचे खच्चीकरण करण्याचे काम सुरू आहे.ही परिस्थिती बदलण्यासाठी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र साठी आपण सर्वांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार हे सर्व सामान्य नागरिकां पर्यंत व तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवावे लागतील तेव्हाच अण्णाभाऊ साठे यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र उभा राहिल असे विचार झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांनी यावेळी व्यक्त केले.
तसेच सागर साळवे,शरद झोंबाड व प्रदीप गायकवाड यांची यावेळी भाषणे झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अर्जुन बागुल यांनी केले तर आभारप्रदर्शन सुनिल सोनवणे यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजन प्रशांत मोरे, गौतम एळीजे, आदी ने केले.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.