भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी सातत्याने केंद्र सरकारच्या कार्यशैलीवर टीका करत आहेत. नुकतंच त्यांनी अखिल भारतीय रास्त भाव धान्य दुकानदारांच्या फेडरेशनच्यावतीनने गरीबांसाठी आंदोलन देखील केले होते. एका भाषणात त्यांनी “नरेंद्र मोदी यांनी कधी चहा विकलाच नाही” असा खळबळजनक दावा केला. “पंतप्रधानांना चहावाला म्हणण्यापेक्षा चहावाल्याचा मुलगा म्हणा” असं ते म्हणाले. या भाषणाचा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चहावाला म्हणू नका, उलट चहावाल्याचा मुलगा म्हणा. कारण चहा आमचे वडील विकत होते. त्यांनी इवल्याशा टपरीवर चहा विकून आम्हा सहा भावंडांना मोठे केलं आहे. तुम्ही पंतप्रधानांना चहावाला बोलून मोठी चूक करताय.” असं वक्तव्य प्रल्हाद मोदी यांनी उल्हासनगर या ठिकाणी केलेल्या आंदोलनात केलं. त्यांच्या या भाषणाची व्हिडीओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे.

राशी भविष्य : १६ सप्टेंबर २०२५ – मंगळवार
मेष : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. वृषभ : महत्त्वाची कामे...