loader image
[ays_poll id=7]

सावधान हे तुमच्या मोबाईल हे अँप असतील तर त्वरित काढून टाका ; गुगल ने केले डिलीट

Aug 5, 2022


गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरून अनेक अँड्रॉइड अ‍ॅप काढून टाकले आहेत. हे अ‍ॅप्स युझर्सना चुकीच्या पद्धतीने टार्गेट करत असल्याचा आरोप आहे. यासोबतच चिंतेची बाब म्हणजे लाखो यूजर्सनी हे अ‍ॅप्स आधीच डाउनलोड केले आहेत. हे अ‍ॅप्स जाहिरातींद्वारे यूजर्सना लक्ष्य करण्याचे काम करतात. जर तुम्ही यापैकी कोणतेही अ‍ॅप्सना इन्स्टॉल केले असेल तर तुम्ही ते लगेच काढून टाकावे.संगणक सुरक्षा कंपनी McAfee ने Google Play Store वर उपस्थित असलेल्या अनेक धोकादायक अ‍ॅप्सबद्दल एक अहवाल सादर केला आहे. रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, हे अ‍ॅप्स युजर्सना चुकीच्या पद्धतीने जाहिराती देत ​​होते. हे अ‍ॅप्स युजर्सचा फोन जाहिरातींनी भरतात, त्यानंतर यूजर्सचा फोन हँग होऊन स्लो होतो. मॅकॅफीच्या अहवालानंतर गुगलने गुगल प्ले स्टोअरवरून 13 धोकादायक अँड्रॉइड अ‍ॅप्सवर बंदी घातली असली तरी, हे अ‍ॅप्स अनेक यूजर्सनी डाउनलोड देखील केले आहेत. Google आपल्या Play Store वर सूचीबद्ध करण्यापूर्वी अ‍ॅप्स सुरक्षा तपासते, परंतु बर्याच वेळा असे धोकादायक अ‍ॅप्स सुरक्षा चक्रातून बाहेर पडून Google Play Store वर सूचीबद्ध होतात. त्यानंतर त्यांची ओळख पटवणे कठीण होते. यातील बहुतांश धोकादायक अ‍ॅप्समध्ये जंक क्लीनर अ‍ॅप्सची नावे होती, जे यूजर्सचा फोन चुकीच्या पद्धतीने वापरत होते.

धोकादायक Android अ‍ॅप्सची संपूर्ण यादी
Junk Cleaner – जंक क्लीनर
Full Clean – फुल क्लीनर
Quick Cleaner – क्विक क्लीनर
Keep Clean – कीप क्लीनर
Super Clean – सुपर क्लीन
Cool Clean – कूल क्लीन
Strong Clean – स्ट्रॉन्ग क्लीन
Meteor Clean – मेटियर क्लीन
Power Doctor – पॉवर डॉक्टर
Fingertip Cleaner – फिंगरटिप क्लीनर
Windy Clean – विंडी क्लीन
Easy Cleaner – ईजी क्लीनर
Carpet Clean – कारपेट क्लीन


अजून बातम्या वाचा..

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  पुणे - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनमाड...

read more
मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड, दि. २५ एप्रिल २०२५: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा...

read more
पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

दिनांक २२/०४/२०२५ रोजी जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाममधिल बैसरण येथे विदेश.देशभरातिल राज्यातून...

read more
.