loader image
[ays_poll id=7]

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज : महागाई भत्त्यात ४% वाढ

Aug 5, 2022

गणेश चतुर्थी, दहीहंडीपासून देशात सणांचा माहौल सुरू होणार आहे आणि त्यापूर्वीच केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक खूशखबर दिली आहे. महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे.

त्यामुळे आधी 34 टक्के असलेला भत्ता 38 टक्के होणार आहे. निवृत्ती वेतनातही तशीच वाढ होईल. तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी किमान वेतनाची मर्यादा सात हजारांवरून थेट 18,000 वर आणली आहे.

आताच्या वाढीचा थेट फायदा 48 लाख सरकारी कर्मचारी आणि जवळ जवळ 68 लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना होणार आहे. सप्टेंबर 2022 पासून ही पगारवाढ लागू होणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ही पगारवाढ पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे जुलै 2022 पासूनची मिळणार आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार, भत्ते आणि इतर आर्थिक फायदे काय आणि किती असावेत हे ठरवणं तसंच वेळोवेळी महागाई दर आणि जीवनशैलीतल्या बदलांनुसार त्यात बदल किंवा वाढ सुचवणं ही महत्त्वाची कामं वेतन आयोग करत असतो.

महागाई भत्त्यांत 4% वाढ – वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार, वर्षातून दोनदा म्हणजे जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई भत्त्याचा आढावा घेण्यात येतो. तेव्हाचा महागाई दर बघून त्यानुसार भत्ता किती वाढणार हे सर्वसाधारणपणे ठरतं.

यंदा जुलै ऐवजी ऑगस्ट महिन्यात हा निर्णय झालाय. महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढून 38 वर आला आहे आणि पूर्वलक्षी प्रभावाने जुलै 2022 पासून तो लागू होणार आहे.

अजून बातम्या वाचा..

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  पुणे - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनमाड...

read more
मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड, दि. २५ एप्रिल २०२५: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा...

read more
पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

दिनांक २२/०४/२०२५ रोजी जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाममधिल बैसरण येथे विदेश.देशभरातिल राज्यातून...

read more
.