loader image
[ays_poll id=7]

श्रीकानिफनाथमाहात्म्य या ग्रंथाने भाविकांच्या अपेक्षा वाढल्या

Aug 7, 2022


नांदगाव (सोमनाथ घोंगाणे ) : महाराष्ट्रातील नाथसंप्रदायाचे संशोधक श्री.मिलिंद सदाशिव चवंडके यांच्या सिध्दहस्त लेखनीमधून साकारलेल्या

|| श्रीकानिफनाथमाहात्म्य || या ग्रंथास विविध प्रांतामधील भाविकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. अवघ्या २७ दिवसात १००० ग्रंथ भाविकांपर्यंत पोहोचले. साध्या, सोप्या, रसाळ, शुध्द मराठी भाषेत ओवीबध्द लिहिलेले या ग्रंथामधील अध्याय भाविकांना अधिक भावले. त्यामुळे साहजिकच भाविकांच्या अपेक्षा वाढल्या असून विविध भाषेत हा ग्रंथ अनुवादीत करावा असे म्हटले जात आहे. भाविकांची अपेक्षापूर्ती करण्यासाठी ग्रंथकार श्री.मिलिंद चवंडके यांनी || श्रीकानिफनाथमाहात्म्य || या मराठीमधील ग्रंथाचा अनुवाद हिंदी, इंग्रजी, कन्नड व तेलगु भाषेत करण्याचा संकल्प केला आहे. या अनुवादाच्या कार्याने मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटक, गोवा, नेपाळ, गुजराथ, राजस्थान, तामिळनाडू अशा सर्व प्रांतांमधील भाविकांना ग्रंथाचा लाभ मिळेल, असा विश्वास श्री.मिलिंद चवंडके यांनी व्यक्त केला.

नवनाथांमधील प.पू.श्रीकानिफनाथांच्या ग्रंथासारख्याच आठही नाथांच्या स्वतंत्र ग्रंथांची निर्मिती करून तेही ग्रंथ अशाच पध्दतीने पाच भाषांमध्ये भाविकांच्या हाती देण्याचा संकल्प श्री.मिलिंद चवंडके यांनी सध्या सुरू असलेल्या श्रावण महिन्यात सोडला आहे.

ग्रंथनिर्मितीची वास्तू पावन क्षेत्र होणार

नवनाथांच्या ग्रंथाचे स्वतंत्र लेखन प्रथमच घडणार आहे. जेथे ग्रंथ लेखन होईल ती वास्तू भारतभरातील भाविकांचे श्रध्दास्थान ठरणार हे उघड सत्य आहे. या ऐतिहासिक दैवी कार्याचे महत्व लक्षात घेऊन कोण दानशूर भाविक या पवित्र श्रावण महिन्यात वास्तू दानाचे पुण्यकार्य करेल, याबद्दल उत्सुकता असल्याचे दिसून येत आहे. आपण सर्वचजण या ग्रंथनिर्मितीच्या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार ठरणार आहोत, या सद् भावनेने नाथभक्तांमध्ये अत्यंत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गोव्यातील रामनाथी येथील सनातन आश्रमाच्या चित् शक्ती सौ.अंजलीताई गाडगीळ यांच्याकडे ग्रंथकार श्री.मिलिंद चवंडके यांनी ||श्रीकानिफनाथमाहात्म्य|| या ग्रंथाचे पाठवलेले सर्व अध्याय महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर या अत्याधुनिक उपकरणाव्दारे पाहिले. उपकरणाने दिलेला वैज्ञानिक चाचणीचा अहवाल ग्रंथामध्ये उतरलेली नाथांची दैवी शक्ती दाखवून देणारा ठरला. करवीरपीठाच्या शंकराचार्यांनीही या ग्रंथाचे आजच्या काळातील महत्व अधोरेखीत केले. वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू श्रीक्षेत्र देवगड येथील हभप भास्करगिरी महाराज यांनीही या ग्रंथाचे वेगळेपण दाखवून दिले.

आजच्या प्रगत संगणक युगात ओवीबध्द ग्रंथ लेखन करणारे संपूर्ण विश्वात अत्यंत दुर्मिळ आहेत. महाराष्ट्रातील श्री.मिलिंद चवंडके यांच्या हातून नाथसंप्रदायावर विशेष कार्य घडेल, हे सनातनचे संत पू.श्री.प्रा. अशोकजी नेवासकर काका यांनी चित् शक्ती सौ.गाडगीळ काकूंना सांगितले होते. ते तंतोतंत खरे ठरले. श्रीक्षेत्र मढी येथील प.पू.श्रीकानिफनाथ संजीवन समाधी मंदिराच्या विश्वस्त मंडळाचा विश्वस्त म्हणून कार्यभार हाती घेताच श्री. मिलिंद सदाशिव चवंडके यांनी गर्भगिरीतील पहिले नाथ संमेलन घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. संमेलनाचे नियोजन करताना त्यांनी महाराष्ट्रातील नाथपीठांवरील पिठाधिपती आणि मठाधिपतींच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेत आशीर्वाद घेतले. या भेटीमध्येही सर्वांनी त्यांना तुमच्या हातून अलौकीक नाथकार्य घडेल, असा आशीर्वाद दिला. नाथसंमेलनाच्या व्यासपीठावरूनही जाहिरपणे याच भविष्यवाणीचा पुनरूच्चार झाला होता.

श्री.चवंडके यांना ओवीबध्द ग्रंथ लेखनाची प्रेरणा स्वतः नाथांनीच देणे व पोथी लिहून पूर्ण होणे हा नाथभक्तांसाठी मोठा कृपाप्रसादच ठरला असल्याचे घरोघरी पोहोचलेल्या ||श्रीकानिफनाथमाहात्म्य || या ग्रंथाने स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, गोवा, गुजराथ, मध्य प्रदेश, तामिळनाडू, दुबई, अमेरिका येथील मराठी भाषिक भाविक ग्रंथ वाचनातून येत असलेल्या प्रभावी अनुभूतींचा आनंद घेत आहेत. आमच्या कुटूंबातील प्रापंचिक समस्या, वैवाहिक समस्या, नोकरीची समस्या, बाधा, अडचणी या ग्रंथाच्या नित्य वाचनामधून सुटत चालल्या असल्याच्या प्रतिक्रिया श्री.चवंडके यांच्याकडे मोठ्या संख्येने येऊ लागल्या आहेत.

नवनाथांच्या स्वतंत्र ग्रंथाचे लेखन करण्यासाठी पुरातन जनमान्य कथांचे संकलन करण्याचा शुभारंभ श्री.मिलिंद चवंडके यांनी केला आहे. अखिल विश्वामध्ये हे नाथ कार्य प्रथमच होणार आहे. हिंदी, मराठी, इंग्रजी, कन्नड आणि तेलगू या पाच भाषांमध्ये नवनाथांचे पारायण ग्रंथ प्रथमच साकारणार असून दररोज वाचण्याकरिताही ते उपयुक्त ठरणार आहेत. या कार्यासाठी मोठा खर्च लागणार हे उघडच आहे. एका भाषेत नाथांचा ओवीबध्द सचित्र ग्रंथ निर्माण करण्यास तीन लाखांचा खर्च अपेक्षित आहे. एका नाथाच्या पाच भाषेतील ग्रंथांसाठी एकूण पंधरा लाखांचा खर्च होईल. नवनाथांचे नऊ ग्रंथ प्रत्येकी पाच भाषांमध्ये निर्माण करण्याकरिता एक कोटी पस्तीस लाखांचा खर्च होईल. हे ऐतिहासिक नाथकार्य पूर्णत्वास जाण्याकरिता सढळ हाताने अर्थसहाय्य करणे गरजेचे आहे. सध्या पवित्र श्रावण महिना सुरू आहे. या महिन्यात ग्रंथनिर्मितीच्या दैवी कार्यास मदत करण्याची सुवर्णसंधी पर्वणीसारखी आली आहे. चिरकाल टिकणार्‍या ग्रंथनिर्मितीस भरभरून दिलेले दान पुण्यकर्मच ठरणार आहे. श्रावण महिन्याची पर्वणी साधून सढळ हाताने अर्थसहाय्य करणे पुण्यप्राप्तीचा आनंद मिळवून देणारे ठरेल. नाथकार्याचा प्रचार व प्रसार करण्याचे व्रत स्वतः नवनाथांनी हाती घेतले होते. हेच व्रत या ग्रंथ निर्मितीमधून पुढे चालणार असून आपलाही या ऐतिहासिक कार्यात हातभार लागला हा आनंद चिरकाल मिळेल.

तन-मन-धन जे शक्य ते सहकार्य स्वयंस्फूर्तीने करावे. जनमानसात प्रचलित असलेल्या आणि माहात्म्य वाढवणार्‍या नवनाथांच्या कथा श्री.मिलिंद चवंडके यांना पाठवाव्यात. विभिन्न प्रांतामध्ये नवनाथांच्या मन भारावून टाकणार्‍या कथा आहेत. श्रद्धाळू भाविकांची भक्ती वाढवणार्‍या कथा जनमानसात आजही प्रचलित आहेत. विविध पुरातन ग्रंथांमध्येही नवनाथांच्या कथा आहेत. नाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेले नाथस्थल, तपोभूमी, साधनाभूमी विविध ठिकाणी आहे. या सर्वांची विस्तृत माहिती पुरातन ग्रंथाआधारे संकलीत करून श्री. चवंडके यांच्याकडे पाठवून या दैवी कार्यात सहभागी होण्याचे भाग्य मिळवावे, असे आवाहन नाथभक्तांकडून करण्यात आले आहे.

माहिती पाठवण्यासाठी पत्ता असा

मिलिंद सदाशिव चवंडके
स्वागत बिल्डिंग, महादेव मंदिरासमोर, अमृतकलश अपार्टमेंट जवळ, बोरूडे मळा, मु.पो.जि. अहमदनगर. (महाराष्ट्र) पिन कोड ४१४ ००१. चल-दूरभाष – ९४२२४९५२८९.


अजून बातम्या वाचा..

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

. शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव...

read more
माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

  मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...

read more
.