loader image
[ays_poll id=7]

भालूर परिसरात तरसाचा धुमाकूळ; मानवी वस्तीत शिरकाव!

Aug 12, 2022

भालूर (वार्ताहर) उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येणारे जंगली प्राणी आता ऐन पावसाळ्यातही मानवी वस्तीत शिरकाव करत असून पाळीव जनावरांना तसेच नागरिकांनाही त्यांनी लक्ष्य करून हल्ले करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
सविस्तर वृत्त असे की तरस या जंगली प्राण्याने रात्री आठ वाजेच्या सुमारास भालूर धरणाच्या परिसरात गायींना लक्ष्य केले त्यानंतर भालूर गावात आदिवासी वस्तीत रात्री नऊ च्या सुमारास या तरसाने धुमाकूळ घातला. गल्लीत काही तरुणांवर त्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर गल्लीत उभ्या असलेल्या दुचाकींची सीट कव्हर, गाडीचे शॉक अप यांना त्याने चावा घेतला. नंतर आदिवासी वस्तीतील तरुणांनी एकत्र येत त्याला गावाबाहेर पळवून लावले मात्र रात्रभर गावकऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण होते.दरम्यान वनविभागाने या वन्यप्राण्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
बिबट्या की तरस ?
दरम्यान सुरुवातीला सोशल मीडिया वर बिबट्या आल्याची माहिती पसरली आणि नेमका हा जंगली प्राणी बिबट्या की तरस याबाबत संभ्रम निर्माण झाला. मात्र जेव्हा त्याने गावातील आदिवासी वस्तीत शिरकाव केला तेव्हा नागरिकांनी सांगितले की बिबट्या नसून तो तरस आहे. परंतु या प्राण्याने गावात शिरकाव केल्याने नागरिक भयभीत झाले आहे.
फोटो: आदिवासी वस्तीत उभ्या असलेल्या दुचाकीच्या शॉक अप ला चावा घेतल्यानंतर लागलेले रक्त.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.