loader image
[ays_poll id=7]

(बघा व्हिडीओ) अंकाई किल्ल्यावरील तळ्यामध्ये पडून दोन युवकांचा मृत्यू

Aug 16, 2022

अंकाई किल्ल्यावरील तळ्यामध्ये पडून दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी घडली आहे. हे दोन्ही युवक नगर जिल्ह्यातील कोपरगाव धारनगावरोडचे असल्याची माहिती समोर आली आहे. मिलिंद रविंद्र जाधव (२०) व रोहीत पिंटु राठोड (१४) रा. कोपरगाव, धारणगाव रोड असे मृत युवकांचे नाव आहे. श्रावण महिन्यात अंकाई किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते. तर पर्यटनाही अनेक तरुण येथे येत असतात.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की,अगस्तीमुनीच्या दर्शनाला आलेले हे दोघे युवक तळ्यात अंघोळीसाठी गेले होते. त्यातील एकाला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बूडत असतांना दुसरा त्याला वाचविण्यासाठी गेला असता तोही पाण्यात बुडाला. यात दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. किल्ल्यावरील असलेल्या काही जणांना याची माहिती मिळताच त्यांनी किल्ल्या पायथ्याशी असलेल्या अंकाई गावातील नागरीकांना याची माहिती दिल्यानंतर त्या दोघांचा मृतदेह तळ्यातून बाहेर काढण्यात आला.अंकाई गावातील पोलीस पाटील संतोष परदेशी यांच्यासह रविंद्र अहिरे, अक्षय वैद्य, राहूल सोनवणे, राहूल अहिरे, लखन व्यापारे, शरद देवकर, पप्पू व्यापारे, नितीन सुरासे, अतुल अहिरे, सचिन जाधव, ज्ञानेशव व दिपक देवकर, सुखदेव सोनवणे,विकास देवकर, शुभम शेलार, अन्वर पठाण, रमजान सय्यद, गुडडू पठाण, श्रीराम सोनवणे या कार्यकर्त्यांनी तळ्यातून दोन्ही मृतदेह शोधण्यापासून तर त्या थेट किल्ल्यावरुन पायथ्याशी आणण्याच काम केले.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.