loader image
[ays_poll id=7]

नगरपालिके समोर गाळेधारकांचे साखळी उपोषण

Aug 19, 2022

नांदगाव: नगरपालिकेने उभारलेल्या नवीन व्यापारी संकुलातील गाळ्यांचे ई लिलाव रद्द करण्यात यावे आणि मूळ गाळे धारकांना प्राधान्याने देण्यात यावे या मागणीसाठी नगरपालिके समोर गाळेधारकांचे साखळी उपोषण .
याबाबत वृत असे की सुमारे १५ वर्षापुर्वी नगरपालिकेने जुने भाजीमाक्रेट तोडून नवीन शॉपीग सेंटर चे काम सुरू केले . या १५ वर्षापुर्वी विस्थापीत झालेल्या जुन्या गाळेधारकांचे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानां नगरपालिकेने ई लिलाव करणेसाठी जाहीरात दिली आहे . सदर इ लिलाव थांबविण्याची मागणी मे .तहसीलदार साहेब तसेच मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे यापुर्वीच केली आहे. तरीही न. पा. इ. लिलाव करण्याच्या तयारीत असल्याने ४२ जुने गाळेधारक न. पा. समोर साखळी उपोषणास बसले आहे .
नांदगाव शहरातील महात्मा फुले चौक येथे नांदगाव नगरपालिकेच्या वतीने व्यापारी संकुल उभारण्यात आले आहे. या संकुलातील गाळ्यांचे ई लिलाव करण्यात संदर्भात वृत्तपत्रात नोटीस प्रसिद्ध करण्यात आली होती ‌ यास जुन्या गाळेधारकांनी आक्षेप घेत प्रशासनाला निवेदन देण्यात आले परंतु याची कोणतीही दखल घेतली न गेल्याने गाळेधारकांनी साखळी उपोषणाचे हत्यार उपसले असून त्यांना विविध राजकीय पक्ष, संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
आज उपोषणास बसलेले गाळेधारक पुढील प्रेमाणे बाबूलाल कायस्थ ‘सरफराज खान ‘संदीप सिसोदिया ‘धनराज सोनवणे ‘कुदरत अली शहा ‘ नारायण निकम’ प्रकाश चव्हाण । रामदास निकम ‘ अब्दुल खालिक ‘
शेख शबिक मोहम्मद ‘राजू निकम ‘ सूर्यभान राजुळे ‘ कैलास शिंदे, कैलास कंदीकलर ‘ गवळी आप्पा ‘ सकाराम सोनवणे ‘रमेश दुबे ‘ भावसाहेब सोनवणे ‘ वनिता सोनवणे आदी गाळेधारक उपोषणास बसले आहेत.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.