loader image
[ays_poll id=7]

नागापुर शिवारात वन्यप्राण्यांकडुन शेतातील मक्याच्या बिट्या फस्त

Aug 24, 2022


मनमाड (योगेश म्हस्के) – मकाच्या बिट्या लागलेल्या शेतात घुसून उभ्या पिकावर मनसोक्त ताव मारत धुमाकूळ घालणाऱ्या वन्यप्राण्यांमुळे वर्षाचे पीक हातातून जाण्याची वेळ नागापूर शिवारातील शेतकऱ्यांवर आली असून भाऊसाहेब पवार यांच्या अडीज एकर उभ्या पिकाचा फडशा पाडल्याने वनविभागाने तातडीने पंचनामे करून मदत देण्याची मागणी होत आहे

नैसर्गिक आणि मानवी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्याला आता वन्यप्राण्यान्च्या उपद्रवाचा सामना करावा लागत असून नागापूर शिवारात वन्यप्राण्यांनी भरल्या पिकांचा फडषा पडण्याचा सपाटा चालवील्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत खरिपाच्या पेरण्या होऊन पिके तरारली असून पिके जोमात आली आहे मात्र डोळ्यासमोर पिके उध्वस्त होत असताना पाहून चिंताग्रस्त शेतकऱ्यांची अज्ञात वन्यप्राण्यांमुळे डोकेदुखी वाढली आहे कोणत्या तरी वन्यप्राण्यांने नागापूर शिवरातील भाऊसाहेब पवार आणि जिजाबाई पवार हे आपल्या मका लावलेल्या शेतावर पिके बघायला गेले असता त्यांना चक्कर यायचेच बाकी होते अगदी जोमात उभ्या असलेल्या आणि मका भरत आलेल्या पिकामध्ये घुसून पाहिले असता मका बीटी राहिलेली नाही मकाच्या बिट्या तोडून अर्धवट खाल्लेल्या आढळून आल्या आहेत अनेक ठिकाणी एकत्र मका खाल्लेल्या आहेत त्यामुळे हा कोणता प्राणी आहे हेच कळून येत नाही उभ्या मका पिकाची नासाडी झाली आहे शेतात घुसून मकावर ताव मारत फस्त करत आहे अर्धवट खाल्लेल्या मका सर्वत्र पडलेल्या आहेत अगोदरच दुष्काळी भाग असल्याने कमी पावसामुळे पिण्याच्या पाण्याची मोठी हाल होतात त्यामुळे पावसाळ्यानंतरची दुसरी पीके घेता येत नाही तर अगोदरच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनी पैसे जमवाजमव करत मका लावली मात्र वन्यप्राण्याच्या धुमाकुळीमुळे वर्षाचे पीक हातातून जाण्याची वेळ आली आहे भाऊसाहेब पवार हे शेतात गेले म्हणून हा प्रकार उघडकीस आला आहे मात्र इतर अनेकांच्या शेतांत असाच प्रकार झाला की काय या भीतीने शेतकरी भयभीत झाले असून वर्षाचे पीक हातातून जाण्याची वेळ आली आहे नेमके कोणत्या वन्य प्राण्याने सदरचे नुकसान केले याबाबत शेतकऱ्यांमध्ये विविध प्रकारे चर्चा सुरु आहे. रानडुक्कर, हरीण, निलगाय की इतर कोणते जाणवरे अशा विविध शक्यता व्यक्त होतं आहेत. फक्त मका बिट्टी एका जागेवर गोळा करून खाण्याचे प्रकार होत असल्याने नक्की कुठला प्राणी नुकसान करत आहे हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. शेतकरी यामुळे चिंतेत पडले आहेत. अनेक शेतकऱ्यांची मका आणि अन्य पिके बहरत आल्याने भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी वनविभागाने याबाबत मार्गदर्शन करणे आणि उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे असून तातडीने पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे.


अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.