loader image
[ays_poll id=7]

गणेशोत्सव उत्साहात व नियमांचे पालन करीत साजरा करावा : चंद्रकांत खांडवी

Aug 27, 2022

कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालखंडानंतर यंदा सर्व सण उत्सव उत्साहात साजरे होत आहे. याच पार्श्‍वभूमीवर उत्सवप्रिय असलेल्या मनमाड शहरात आगामी गणेशोत्सव उत्साहात शांततेत नियमांचे पालन करून शिस्तीत साजरा करावा असे आवाहन मालेगाव विभागाचे अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत खांडवी यांनी केले.आगामी गणेश उत्सवानिमित्त मनमाड शहर पोलिस स्टेशनमध्ये आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर मनमाड विभागाचे पोलिस उपअधिक्षक समिरसिंह साळवे, नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ.सचिनकुमार पटेल, महावितरणचे शहर अभियंता एस.बी.शिंदे , सहाय्यक निरिक्षक प्रल्हाद गीते आदी उपस्थित होते.मिरवणूक मार्गावर अनेक ठिकाणी लोबंकळणार्‍या वीजेच्या तारा, मोकाट जनावरांचा वाढता उपद्रव तसेच गणेशकुंड व इतर ज्या ठिकाणी श्रींच्या मूर्तीचे विसर्जन होते. तेथील स्वच्छता, विसर्जनानंतर मूर्तीची योग्य ती काळजी आदी गंभीर विषय आझाद आव्हाड, राजाभाऊ पारीक, संतोष बळीद, दिनेश केकाण व समितीच्या सदस्यांनी मांडले. मनमाड नगरपालिका प्रशासन उत्सवाच्या पूर्व तयारीसाठी सज्ज आहे.१३फूट खोल गणेश कुंडाची स्वच्छता करून त्यात मुबलक पाणी भरले जाईल. मिरवणूक मार्गासह इतर ठिकाणचे खड्डे तात्काळ बुजवण्यात येतील मिरवणूक मार्गावर सी.सी.टिव्ही, तसेच बॅरीकेटींगची व्यवस्था करण्यात आली आहे. येत्या काही महिन्यात शहरातील मोकाट जनावरांच्या उपद्रवाचा प्रश्‍न कायम स्वरूपी मिटवण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्याधिकारी सचिनकुमार पटेल यांनी केले.मनमाड शहरातील सण उत्सवाची परंपरा गणेशोत्सवात कायम ठेवा विविध समस्यांची नोंद पोलीस प्रशासनाने घेतली आहे. गणेशोत्सवासाठी प्रशासन सज्ज असून मंडळांना परवानगीसाठी पोलीस ठाण्यात ठाण्यात एक खिडकी योजना सुरू केली जाईल, याच ठिकाणी सर्व परवानग्या मिळतील, मिरवणुकीत डिजे वाजवला जाणार नाही. ध्वनी आवाजाची मर्यादा पाळावी, सामाजिक एकोेप्याचे संदेश देणार्‍या सजावटी सादर कराव्या असे आवाहन उपअधिक्षक साळवे यांनी केले.शहरात उत्सवासाठी ६ अधिकारी, ४० बाहेरगावचे पोलिस कर्मचारी, ७३मनमाड पोलिस स्टेशन कर्मचारी, एसआरपी, आरसीपी पथक, पुरूष महिला होमगार्ड असा बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक निरिक्षक प्रल्हाद गीते यांनी दिली.अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत खांडवी यांनी उत्सव काळातील विविध नियम आणि सुचनांची माहिती दिली.तर महावितरणचे अभियंता एस.बी.शिंदे यांनी महावितरणच्या उपाययोजनांची माहिती दिली.यावेळी अशोक व्यवहारे, मयूर बोरसे, डॉ.वर्षा झाल्टे,अ‍ॅड आम्रपाली निकम , अल्ताफ शहा, अनिल गुंदेचा, नितीन पांडे, भागिनाथ वडनेरे, इलियास पठाण, नितीन पाटील, रविंद्र घोडेस्वार, दिनेश केकाण, प्रमोद पाचोरकर, विजू मिश्रा , सनी फसाटे, संजय भालेराव, अशोक पाईक, नाना शिंदे, कैलास बेदमुथा, कैलास भाबड, सिध्दार्थ संसारे, स्वराज देशमुख, छोटू धाकराव, मुन्ना गुप्ता, सुभाष माळवतकर आदींसह गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते विविध शासकीय विभागांचे अधिकारी व शांतता समिती सदस्य उपस्थित होते

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मनमाड - आम्ही...

read more
नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नांदगाव : मारुती जगधने नांदगांव तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेल्या व थकित झालेल्या ९...

read more
मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदव्युत्तर...

read more
भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...

read more
मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

सुवा फिजी येथे १४ ते २१ सप्टेंबर २०१४ रोजी होणाऱ्या कॉमनवेल्थ चँपियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका मुलाखती दरम्यान काँग्रेस भारतात सत्तेत आल्यास आरक्षण काढून टाकू...

read more
कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

नांदगांव : दि १३ मारुती जगधने दि.13 सप्टेंबर 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम...

read more
.