नांदगांव – नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील बोलठाण येथे दुपारी अडीचच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. रोहिला रस्त्या लगत संजय बारवकर यांच्या शेतात वीज पडल्याने 2 महिला जखमी झाल्या असून त्यांना पुढील उपचारासाठी नांदगाव येथे हलविण्यात आले.
पावसाने बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा हजेरी लावल्यामुळे परिसरातील शेतकरी सुखावला आहे.आज दुपारी १ वाजे पासून दिनांक परिसरात पावसाचे वातावरण निर्माण होऊन 2 ते 2:30च्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली यात रोहिला रस्त्या लगत बोलठाण शिवारात येणाऱ्या संजय बारवकर यांच्या शेतात वीज पडली त्यात कल्पना संजय बारवकर,
ललीता प्रभाकर बारवकर या दोन महिला जखमी झाल्या असून त्यांना नांदगाव येथुंन मालेगाव येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
आनंद धर्मार्थ दवाखाना आयोजित आरोग्य तपासणी शिबिरास उदंड प्रतिसाद
आनंद धर्मार्थ दवाखाना व स्व.डॉ.सी.एच.बागरेचा प्रेरित कायमस्वरूपी नेत्र चिकित्सा शिबिर व एसएमबीटी...











