loader image

नांदगाव शहरातील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षक दिन उत्साहाने साजरा केला.

Sep 6, 2022


नांदगाव (सोमनाथ घोंगाणे) : शहरातील जे. टी . कासलीवाल इंग्लिश मिडियम स्कुल मध्ये ५ सप्टेंबर शिक्षक दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला .या दिवसाचा संपूर्ण कार्यक्रम विद्यार्थ्यांनी आखला होता. तो अत्यंत नेटकेपणाने पार पडला . शिक्षक दिनाच्या निमित्ताने शाळेचे संपूर्ण कामकाज विद्यार्थ्यांनी सांभाळले. शिक्षक झालेल्या विद्यार्थ्यांनी विविध विषयांचे पाठ घेतले. वर्गातील विद्यार्थ्यांनी त्यांना उत्तम सहकार्य दिले. मधल्या सुट्टीनंतर शाळेच्या प्रांगणात समारंभ आयोजित करण्यात आला. विद्यार्थी प्रतिनिधी सार्थक देशमुख ,कोमल भावसार यांनी सर्व कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन शिक्षकांसाठी करण्यात आले होते. त्यामध्ये जिलेबी रेस, संगीत खुर्ची, लिंबू चमचा,वकृत्व स्पर्धा,समूह नृत्य अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थी शिक्षकांनी आपल्या मनोगतातून शिक्षकाविषयी कृतज्ञता व्यक्त केली. मुख्याध्यापक श्री मनी चावला सर यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना व शिक्षकांना प्रोत्साहित केले. प्रयत्न करत रहा यश हमखास मिळेल असे त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले. कार्यक्रमाच्या समारोप केक कापून करण्यात आला.
सर्व विद्यार्थीना व शिक्षिकांना संस्थेचे चेअरमन श्री. सुनीलकुमार कासलीवाल तसेच संस्थेचे सेक्रेटरी विजय चोपडा, जुगलकिशोर अग्रवाल, रिखबचंद कासलीवाल, महेंद्र चांदीवाल,सर्व पदाधिकारी,प्रशासन अधिकारी प्रकाश गुप्ता, प्रिन्सिपल मनी चावला सर शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी शिक्षक पुनम सुराणा व वीरा पाटणी यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

. शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव...

read more
माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

  मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...

read more
.