एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (नागरी) नाशिक-२ मधील अंगणवाडीताईं व मदतनिसताईंचा राष्ट्रीय पोषण माह २०२२ चे कालावधीतील नाविन्यपूर्ण उपक्रम “मुंबई स्वयंपाकघर” या फेसबुक पेजवरुन लाभार्थींचे पालक व इतरही नागरिकांना माहिती दिली जाते आहे * कुपोषण हटविण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात पारंपारिक खाद्यपदार्थाचा
आहारात वापर करावयाचा आहे..हा पारंपारिक आहार आपल्या पोषणासाठी कसा योग्य आहे.पोषण अभियान हे एक जन आंदोलन आहे..त्यामुळे जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोषणाचा योग्य संदेश पोहोचणे व त्याद्वारे पोषणाचे वर्तनात बदल घडवून आणणे अभिप्रेत आहे.. (नागरी) नाशिक-२ प्रकल्पात सोशल मिडियाचा प्रभावी वापर करुन जनजागृती केली जात आहे..स्थानिक आहाराचे महत्व पटवून देत असतांना अंगणवाडीताई, मदतनिसताई या स्वतः स्थानिक पदार्थांचा वापर करुन उपयुक्त अशा पौष्टिक पाककृती तयार करत आहेत..या पाककृती तयार करतांना वापरावयाच्या साहित्यासह संपुर्ण माहिती सोशल मिडियाद्वारे जनतेसमोर सादर केली जात आहे..यात “मुंबई स्वयंपाक घर”या फेसबुक पेजवरही माहिती पाठविली जाते आहे..त्यातून काही पाककृती शिदोरी पेजवरही निवडल्या जात आहेत..फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, व्हाट्सअप, शेअर चॕट इ. माध्यमातुनही नागरिकांपर्यंत स्थानिक पाककृतींची माहिती पाठविली जात आहे..राष्ट्रीय पोषण माह २०२२ मधील या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे अनेक स्तरावरुन कौतुक केले जात आहे.












