श्री रुद्र हनुमान सार्वजनिक गणेश मित्र मंडळ,मनमाड यांचे यंदाचे १५ वे वर्ष आहे.विशेष म्हणजे सर्व कुमार वयातील मुलांचे हे मंडळ असून सामाजिक,सांस्कृतिक,धार्मिक व आरोग्य व पर्यावरण संवर्धन या बाबतीत सेवा देण्यात हे मंडळ अग्रेसर असून वेळोवेळी वस्त्र संकलन तसेच मुक्या प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सेवा तसेच नित्य गोग्रास सेवा आदी उपक्रम राबविण्यात येत असतात.यंदाच्या वर्षी कै. संजय रामचंद्र कांगणे यांच्या स्मरणार्थ ‘मोफत त्वचारोग निदान व औषधी वाटप शिबीर’ आयोजित करण्यात आले होते. यात जवळपास 340 च्या वर नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला यावेळी मोफत त्वचा रोग तपासणी तसेच मोफत औषधी वाटप करण्यात आले. यावेळी येवला येथील प्रसिद्ध त्वचारोग तज्ञ डॉ. ज्ञानेश्वर सोनवणे यांनी मोफत तपासणी ची सेवा दिली. तसेच सलग व्या वर्षी ‘भव्य रक्तदान शिबीराच्या’यंदाच्या 3 ऱ्या वर्षी 125 नागरिकांनी रक्तदान करून आपले सामाजिक कर्तव्य पार पाडले. ‘जनकल्याण रक्तपेढी,नासिक’ यांच्या टीमने तसेच मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.














