अंगणवाडी ताईने गणेशोत्सावात तसेच गणपती विसर्जनात ही विविध थीमच्या माध्यमातुन पथनाट्य,मिरवणुका, विविध मंडळाला भेट देवुन पोषण माह २०२२ चे विविध उद्दीष्टे साध्य करण्यासाठी केली जनजागृती.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक -२.मधील कार्यान्वित १०० अंगणवाडी ताईनी गणेशोत्साहात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.

पोषण अभियानाची सुरुवात होताच विविध सणांची सुरुवात होते .आपले सण,समारंभ,रुढी परंपरा यातुन विविध संदेश देवुन लोकांना पोषणाच्या वर्तनात बदल घडविणे या साठी महत्वपुर्ण संदेश दिले जाते.कुपोषण हे विविध घटकांच्या परिणामामुळे होत असते त्यात बदल घडवुन आणणे खुप महत्वाचे असते .त्यासाठी लोकांचा सहभाग नोदंवुन हे एक आंदोलन होवुन ही एक लोक चळवळ व्हावी यासाठी तसे संदेश त्यांच्या पर्यन्त पोहचविणे खुप गरजेचे आहे. त्यामुळे अंगणवाडी ताईने अशा उत्साहात सहभाग नोदंवुन विविधथिमच्या माध्यमातुन लिंगसंवेदनशिल,जलसंधारण आणि व्यवस्थापन ,पोषणासोबत शिक्षणदेखिल,महिला आणि स्वास्थ,बालक आणि महिलांसाठी पारंपारिक खाद्यपदार्थ जनजागृती केली.लोकांपर्यन्त योग्य संदेश पोहचवुन कुपोषण हटविण्यासाठी बालकांच्या आहार,आरोग,स्वच्छता,शिक्षणाविषयी महत्वपुर्ण संदेश दिले.













