loader image
[ays_poll id=7]

साकोरा येथील पेडकाई माता सामाजिक शैक्षणीक संस्थेचा २४ वा वर्धापन दिन साजरा

Sep 11, 2022


नांदगाव सोमनाथ घोंगाणे

नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील पेडकाई माता सामाजिक शैक्षणिक संस्था साकोरे ता नांदगाव जि नाशिक संस्थेचा २४ वा वर्धापन दिन आज मोठया उत्साहात साजरा झाला.
आज संस्थेच्या वर्धापन दिना निमित्तानं गावातून पेङकाई माता प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली यावेळी इयत्ता दहावी च्या विद्यार्थीनी लेझीम नृत्य , देशभक्तीपर गीत , लोकगीत यावर सादरीकरण केले तसेच लहान वर्गातील विद्यार्थी समाजसुधारक बनले होते .नंतर विद्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यासाठी संस्थेचे विद्यमान सचिव राजेद्र बोरसे हे अध्यक्ष स्थानी होते तसेच संस्थेचे उपाध्यक्ष भारत बोरसे , खजिनदार रविद्र बोरसे व आमच्या सर्वानंचे मार्गदर्शक स्थानीक स्कुल कमेटी चेअरमन रमेश झेला बोरसे , आधार स्तंभ धरमचंदजी कासलिवाल , प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक बोरसे व्ही पी यांनी मांङले तर कुमारी मानवी बोरसे व इतर मुलीनी संस्थे बद्दल माहिती सांगितली शिक्षकांन मधून क्षीरसागर सर , मनोहर बोरसे सर , भाबङ सर , बोरसे ए आर सर यांनी संस्थेच्या वाटचालीत संचालक मंङळ किती खंबीर पणे ऐकजूटी ने उभे राहत व काम यशस्वी करत त्यामुळे आज एक रोपटे वृक्ष म्हणून उभे आहे . आम्हांला कधीच संस्थेचे पदाधिकारी व आम्ही सेवक हा भेद भाव केला नाही मित्र म्हणून वागणूक दिली व देत आहे. असे भावनात्मक विचार मांङले . मुख्याध्यापक तसेच संस्थेचे संचालक योगेश पाटील यांनी संस्थेच्या वाटचालीत आमच्या पाठिमागे खंबीर पणे उभे राहाणारे रमेश आण्णा व धरमचंदजी कासलीवाल यांच्या रुपाने एक शक्तीच आमच्या सोबत असल्यामुळे हा प्रवास सुखकर झाला . योगेश पाटील यांनी सांगितले की पुढील वर्धापन दिन रौप्य महोत्सवी असेल त्यावेळी संस्थेची आज पर्यत ची वाटचाल पुस्तक स्वरुपात प्रकाशित करण्यात येईल . संस्थेचे माजी सचिव विलासबापू बोरसे यांनी संस्थेच्या वाटचालीत साथ देणारे संचालक कै विठ्ठल बोरसे व शिक्षक आर ङी बोरसे यांच्या जाण्याने आम्ही पोरके झाल्याच्या भावना व्यक्त केल्या शिक्षकांनी विद्यार्थी हित लक्षात घेता अध्यापन करावे तसेच संस्थेची भरभराट कशी होईल हे पहावे. कार्यक्रमाचे सुञसंचलन सुदर्शन सुरसे यांनी तर आभार पुनम बोरसे मँङम यांनी केले . आज विद्यार्थाना संस्थे कङून मिष्ठान्न जेवण देण्यात आले होते . शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव राजेद्र बोरसे यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले विद्यालयात २४ वर्षांपासून दरवर्षी ४०० ते ४५० विद्यार्थी शिक्षण घेत आहे अनेक विध्यार्थांनी संस्थेबरोबर गावाची शान व सन्मान वाढविला. या पुढे ही उत्तरोत्तर प्रगती संस्थेची होत राहो गाव पातळीवर आमच्या सर्व लोकप्रतिनिधीचे आशीर्वाद मिळत राहो. विविध शासकीय योजना अन्य शैक्षणिक संकुलाप्रमाणे आम्हाला ही मिळत राहो ही माफक अपेक्षा
आजपर्यंत आपण सर्वांनी संस्थेच्या पाठीशी उभे राहून संस्थेला प्रगती पथावरआणलेत अशा सर्व ज्ञात अज्ञात प्रेम करण्याऱ्या सर्व घटकांचे हार्दिक हार्दिक धन्यवाद यावेळी संस्थेचे संचालक प्रा अशोक बोरसे , संजय बोरसे रामकृष्ण बोरसे , शिक्षक व शिक्षकेत्तर वृंद उपस्थित होते श्रीमती बोरसे मँङम यांनी विद्यार्थाना फुटबाँल , व्हाँलीबाँल भेट दिला . तसेच विलासबापू यांनी विद्यालयाच्या ग्रंथालयास कपाट भेट दिले.

 


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
.