नांदगाव ( सोमनाथ घोंगाणे) पंचायत समिती नांदगाव तसेच तालुका विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय राष्ट्रीय विज्ञान मेळावा व नाट्य उत्सव, सन 2022-2023 न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव येथे साजरा करण्यात आला. विज्ञान मेळाव्यासाठी नांदगाव तालुक्यातून प्रथम बक्षीस कु.आर्यन सुदर्शन सुरसे पेडकाई माता माध्यमिक विद्यालय,साकोरे ता.नांदगाव या शाळेला मिळाले तसेच द्वितीय क्रमांक न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव या विद्यालयातील विद्यार्थिनी श्रुती रावसाहेब सोनवणे हीला मिळाले आहे. दोन्ही विद्यार्थ्यांची विज्ञान मेळाव्यासाठी जिल्हास्तरावर निवड करण्यात आली आहे.तसेच न्यू इंग्लिश स्कूल, नांदगाव येथील नाटिका अविनाश शेवाळे लिखित कोरोना महामारी एक आव्हान यांचे जिल्ह्यास्तरावर निवड करण्यात आली. सदर मेळाव्याचे उदघाटन गटशिक्षणाधिकारी चिंचोले साहेब नांदगाव पंचायत समिती,तसेच न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव येथील मुख्याध्यापक गोटे डी. व्ही.व पर्यवेक्षक .तुकाराम घुगे सर, नाशिक जिल्हा विज्ञान अध्यापक संघ कार्यवाह अरुण पवार , परीक्षक म्हणून. विद्या देवरे (माळी) मॅडम,ॳॅड. सचिन साळवे ,प्रा.सुरेश नारायणे , तसेच नांदगाव तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष .सी.डी.अहिरे, . उपाध्यक्ष सुनील कोठावदे नांदगाव तालुका विज्ञान अध्यापक संघ तसेच न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव येथील विज्ञान व गणित शिक्षक अविनाश शेवाळे ,सुपेकर सर,तसेच माताडे सर इत्यादी शिक्षकांचे विशेष सहकार्य लाभले.
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...











