Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

रेल्वे खाली सापडून युवक मृत्युमुखी

Sep 17, 2022

मनमाड शहरापासून जवळ असलेल्या एकवई येथील २६ वर्षीय तरुणाचा लोहमार्ग ओलांडताना रेल्वेखाली सापडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी मनमाड – भुसावळ लोहमार्गावर घडली. या घटनेने एकवई गाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.या प्रकरणी मनमाड पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शहरापासून ४ किलोमिटर अंतरावर असलेल्या एकवई (ता.नांदगाव) येथील जनार्दन रामभाऊ बेदाडे,वय-२९ हा तरुण मनमाड येथे हमालीचे काम करीत होता.मात्र आज शुक्रवारी मनमाडहून दुपारी घरी जाताना गर्डर शॉप समोर असलेल्या मनमाड – भुसावळ लोहमार्ग ओलांडताना भरधाव वेगाने धावणाऱ्या रेल्वेने धडक दिल्याने हाता पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत होवून जागीच प्राण ज्योत माळवली. दरम्यान सदर मृत्यू पावलेला तरुण हा आई-वडिलांना एकुलता एक होता.तर त्यांची घरची परिस्थिती नाजूक असल्याने वडील आणि तो शहरात मिळेल ते काम करीत होते. असे बोलले जात असून त्याने परिस्थितीला कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा आहे.मात्र सर्वांशी मनमिळाऊ स्वभाव असलेल्या जनार्दनचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

अजून बातम्या वाचा..

केंद्र सरकारचा कुटुंब आरोग्य सर्वेक्षण अहवाल : मनमाड मध्ये जैन समाजाने मोर्चा काढत केला निषेध

केंद्र सरकारचा कुटुंब आरोग्य सर्वेक्षण अहवाल : मनमाड मध्ये जैन समाजाने मोर्चा काढत केला निषेध

संपूर्ण विश्वाला अहिंसा, शुद्ध शाकाहार आणि जियो और जिने दो चा संदेश देणाऱ्या भगवान महावीर...

read more
कु.देवयानी प्रशांत ललवाणी एमबीबीएस परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण ; शहरातील एमबीबीएस डॉक्टर होणारी पहिली महिला

कु.देवयानी प्रशांत ललवाणी एमबीबीएस परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण ; शहरातील एमबीबीएस डॉक्टर होणारी पहिली महिला

मनमाड शहरातील प्रसिद्ध अशा ललवाणी कुटुंबातील श्री प्रशांत भाऊ ललवाणी यांची सुकन्या डॉ. कु. देवयानी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]