loader image
[ays_poll id=7]

यांसी जीवन ऐसे नाव, मतिमंद मुलांच्या चेहऱ्यावरील भाव छटा…

Sep 18, 2022


 

काल आमचे मित्र डॉ.उदय मेघावत यांची मुलगी अन्वेशाचा वाढदिवस ( १७ सप्टेंबर ) होता…त्या निमित्ताने हा वाढदिवस मतिमंद शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये जावून साजरा करायचा असं तिने ठरवले होते..त्यानुसार शहरालगत असलेल्या गंगाधरी येथील मतिमंद शाळेशी संपर्क करत आम्ही तशी सूचना शाळेतील शिक्षक यांच्यापुढे मांडली आणि मुलांना जेवण देण्याबाबतही विचारले..तेथील शिक्षकांनी होकार देताच सायंकाळी ६ वाजेपर्यंत या. असे सांगितले…त्यानुसार आम्ही ६ वाजता गरमा गरम मसाले भात व साजूक तुपाचा शीरा घेवून तिथे पोहोचलो…शाळेत जशी आमची ‘ एंट्री ‘ झाली तशी शाळेतील मुलांची लगबग सुरू झाली..जेवणाचे साहित्य खाली उतरवले अन् मुलांकडे जावून बसलो…त्यात एका मुलीने ‘ मॅडम आली मॅडम आली ‘ म्हणून आवाज दिला..मतिमंद मुलं असल्याने ते कसे असतील, कसा प्रतिसाद देतील हे सर्व प्रश्न डोक्यात असतांनाच त्यांनी या हुशारीचा प्रत्यय आणून दिला..मग सर्व मुलांनी मॅडमचे स्वागत म्हणून ‘ टाळ्या ‘ देखील वाजवल्या.. मुलं जेवायला बसली..उदय, निष्मा मॅडम, निखिल, खुशू तसेच अन्वेशाने देखील या मुलांना वाढायला सुरुवात केली..त्यानंतर मुलांनी गरमागरम मसाले भात व साजूक तुपाच्या शिऱ्या सोबत जेवणाचा आनंद घ्यायला सुरुवात केली..जेवण सुरू असतांना मध्येच ही मुलं आपल्या सोबत असलेल्या मुलांची काहीतरी चेष्टा करून हसावायची..एक वेगळाच आनंद व्हायचा त्यांच्याकडे बघून..जेवण करतांना देखील आपल्याला काय हवंय हे अगदी सहज तेथील उपस्थित शिक्षकांना ते सांगायचे..काहींच्या तोंडून पदार्थांबाबत उच्चार निघत नव्हता मात्र तेथील उपस्थित शिक्षक ते लगेचच ओळखून त्यांच्यापुढे मांडायचे..मनसोक्त जेवणाचा आनंद लुटल्यानंतर मग आम्ही त्या मुलांशी व शिक्षकांशी चर्चा करू लागलो..ते मुलं कशी वागतात, त्यांना कसं सांभाळावं लागतं वैगरे असे आमच्या मनातील प्रश्न होतेच..शिक्षकांनीही मग आम्हाला त्यांचा सांभाळ करण्याच्या पद्धती सांगितल्या.. अर्थात अशी मुलं सांभाळणे तसे जिकिरीचेच काम..त्यातील काही मुलं वागण्यात कशी हुशार आहे हे सरांनी आम्हाला सांगितलं..तेवढ्यात एक मुलगा कानाला मोबाईल लावून पुढे आला..मग आम्ही सहजच उत्सुकतेने सरांना विचारलं की सर हा तर मोबाईल वापरतो…त्यावर सरांनी उत्तर दिलं की, तो मोबाईल नसून त्याने एक लाकडी वस्तूला कव्हर लावून त्यावर तारेने विशिष्ट पद्धतीने पॅक करून त्याचा मोबाईल बनवला आहे ..आम्हीही तो त्याचा मोबाईल हाताळला असता अतिशय कल्पनाशक्ती वापरून सुंदर अशा पद्धतीने त्याने तो तयार केलेला होता..आणि विशेष म्हणजे त्या मोबाईल मध्ये मस्तपणे आणि दिलखुलास पणे रमतही होता..या मुलांमध्ये तांड्यावरील ‘ तेजू ‘ नावाची एक मुलगी देखील होती, ती आपल्या इतर शाळेतील सहपाठी मुलांसोबत हिंदीमध्ये संवाद करायची कारण ति बंजारा कुटुंबातील असल्याने तीला मराठी भाषा तशी स्पष्ट बोलता येत नव्हती..मग आम्ही तिच्याशी बंजारा भाषेत संवाद साधला असता अतिशय छान पद्धतीने तिने उत्तर दिली..अर्थात आमचे प्रश्नही आई कुठे आहे ?, आईचे नाव काय असेच होते ? पण तिने त्या प्रश्नांचे योग्य असे उत्तर दिले…मग सर्व मुलं आणि शिक्षकांसोबत काही फोटो आणि सेल्फी देखील काढले..फोटो काढतांना पण ही मुलं अतिशय खुश आणि समाधानी दिसत होती..थोड्यावेळ या मुलांमध्ये आम्ही इतके रमून गेलो की तिथून निघावं असं वाटतं नव्हत पण शिक्षक आणि मुलांची रजा घेवून आम्ही निघालो असता मुलांनी आम्हाला ‘ बाय ‘ करून निरोप दिला..पण तो ही आम्हाला भेटायला लवकर या, या वाक्यानेच..एकीकडे मुलांना आपण सर्व काही उपलब्ध करून देतो तरीही समाधानी नसलेली आपली मुलं..आणि त्या मुलांना कुठल्याही गोष्टी सहज उपलब्ध होत नसतांना त्यांची जीवन जगण्याची धडपड मात्र वाखाणण्याजोगीच होती..त्या मुलांच्या चेहऱ्यावरील समाधान व गोड हसू आजही आमच्या डोळ्यात तरळत आहे..

– संदीप जेजुरकर, नांदगाव..


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
.