
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (नागरी) नाशिक – २,पोषण महा अंतर्गत १ ते ३० सप्टेंबर २०२२ यात महिला आणि बालक याच्यांसाठी उपलब्ध स्थानिक आहाराची जसे की -ज्वारी/ बाजरी/ दादर /नागली /भगर/ राजगिरा /अळीव /यासारखे भरड धान्य कडधान्य/ शेवगा/ चवळी/ टाकळा/ आळुचे पान/ दुधीभोपळा/ लाल भोपळा /गिलके /दोडके कढीपत्ता/ पपई /पेरू /सिताफळ इत्यादी व यासारख्या हंगामी स्थानिक पारंपारिक भाज्या, फळे,इतरही फळभाज्या वापरून केलेल्या स्थानिक पारंपारिक आहाराचे महत्व पटवुन दिले, पुरक पोषण आहार म्हणजे नुसते महागडे अन्नपदार्थ,तेलकट,तुपकट पदार्थ खाणे नव्हे तर स्थानिक उपलब्ध ,भाज्या,फळभाज्या इतर अन्नघटकांचा योग्य प्रमाणात, योग्य रितीने वापर करणे होय याविषयी जनजागृती करण्यात आली, या कार्यक्रमासाठी अंगणवाडी सेविका,सिमा चौधरी,कल्पना जाधव,राजश्री निकम,मदतनिस ताई मनिषा वाघ यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले..












