loader image
[ays_poll id=7]

नांदगाव शहराचे ग्रामदैवत पेशवेकालीन ग्रामदेवता श्री एकवीरादेवी (माता)

Sep 24, 2022


नांदगाव सोमनाथ घोंगाणे

नांदगाव शहराची ग्रामदेवता असलेले पेशवेकालीन श्री एकवीरा देवीचे शारदीय नवरात्रौत्सव सोमवार दिं२६/९/२२ पासून सुरू होत आहे.

श्री एकवीरा देवीचे मंदीर शाकांबरी नदीच्या किनारी वसलेले आहे. मंदीरासमोर ३१ फुट उंचीची दगडी दीपमाळ आणि त्याखाली श्रीगणेशाचे छोटेसे मंदीर आहे .दर्शनाला जाण्यापुर्वी श्री गणरायाचे दर्शन होते त्यानंतर मुख्य मंदीरात प्रवेश होतो.बाजूलाच रेणुका माता आणि गणेशाची मूर्ती आहे . या मंदीराला दोन घुमट आहे. मंदीराच्या गाभाऱ्यात देवीची स्वंयभू अशी भव्य मुर्ती आहे.

  

सदर मंदीर पेशवेकालीन १७ व्या शतकातील असल्याचे भावीक सांगतात सुमारे १७ व्या शतकात ब्रम्हानंद महाराज यांना दृष्टांत झाल्याचे त्यांनी पेशव्यानां सांगितले . मग पेशव्यानीं या मंदीराचा जिर्णोद्वार केला.मंदीराच्या मुख्य गाभाऱ्यात देवीची स्वंयभू अशी ११ फूट उंचीची भव्य मुर्ती असून मुर्तीला १८ भुजा असून १८ ही भुजात विविध आयुधे असून देवी वाघावर स्वार झालेली असून पायाखाली शुभं नीशुभं राक्षसाची मुर्ती आहे .श्री एकवीरा देवीची चैत्र महिन्यात तीन दिवस यात्रा भरते . यावेळी देवीच्या पालखीची गावातून मिरवणूक काढल्या जाते . यावेळी कुस्तीचे फडही रंगतात . तसेच नगरपालिके समोरील छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकातून बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होतो .

शारदीय नवरात्रात चैत्र शुद्व प्रतिप्रदे पासून नऊ दिवस नवरात्र उत्सव चालतो यावेळी मंदीरात घट बसविले जातात . तसेच काही महिला घटी म्हणून बसतात .नवरात्रात देवीला नऊ दिवस नऊ पैठण्या नेसवल्या जातात . रोज नवीन शृगांर केला जातो . मातेचे रूप रोजच्या रोज बदलते . रोज तीनही रूपामध्ये देवीचे दर्शन होते .देवीची पुजाअर्चा करण्याचा मान गुरव घराण्याकडे आहे. गुरव घराण्याचे स्वर्गीय काशीनाथ / तुकाराम / विश्वनाथ / अंबादास गुरव यांनी नित्य नेमाणे देवीची पुजाअर्चा केली .आज या घराण्याची पाचवी पिढी प्रसाद गुरव व त्याची मातोश्री श्रीमती मंगला गुरव हया नित्य नेमाने पुजा अर्चा करीत आहे .नवरात्रोउत्सवात देवीला सोन्या चांदीचे आभुषणे चढविली जातात . चांदीचे एक मुकूट एक टोप हातकंगण व सोन्याची नथ चांदीची छत्री असून काही दागिणे बेन्टेक्स चे आहे. देवीची रोज पुजाअर्चा करून आरती केली जाते . मंगळवार व शुक्रवारी विशेष पुजा करून आरती केली जाते . यावेळी परिसरातील भावीक मौठया संख्येने उपस्थित असतात . चैत्र व नवरात्र उत्सव काळात पालखीतून देवीचा तांदळा व मुकूट याची गावातून मिरवणूक काढली जाते . हिदूं पंच कमेटी कडून मंदीराची देखभाल केली जाते . तसेच छत्रपती जनसेवा मंडळाचे अध्यक्ष राजेश (बबी काका) कवडे यांच्या मार्गदर्शना खाली शेकडो कार्यकर्ते या उत्सव काळात देवीची सेवा करीत असतात . मंदीराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे काम पुर्ण झाले असून आमदार सुहास कांदे यांच्या आमदार निधीतून सभामंडपाचे काम पुर्ण झाले असून ‘ पुढचा टप्पा म्हणून मंदीर परिसराचे सुशोभीकरण करण्याचा व भाविकासाठी अधीक सुखसुविधा उभारण्याचा ट्रस्टीचा मानस आहे.ग्रामदैवत श्री एकवीरा मातेचे मंदीर दिमाखात उभे आहे.


अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
.