loader image
[ays_poll id=7]

जे लोकांना वाटते,तेच आम्ही करणार ; सरस्वतीचे फोटो काढले जाणार नाही: मुख्यमंत्री शिंदे

Sep 28, 2022


छगन भुजबळ यांनी सरस्वती संदर्भात केलेल्या वक्तव्याबद्दल नवा वाद निर्माण झाला असून यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरस्वतीचे फोटो काढले जाणार नाही, कोणाला काय वाटेल ते करणार नाही. जे लोकांना वाटते, तेच आम्ही करणार अशी खरमरीत प्रतिक्रया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. कालच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भुजबळांच्या वक्तव्यावर सडकून टीका केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकमध्ये एका धार्मिक कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी याबाबत आपले मत व्यक्त केले. दोन दिवसांपूर्वी मुंबई येथील एका कार्यक्रमात छगन भुजबळ यांनी सरस्वतीच्या फोटो संदर्भात वक्तव्य केले होते. यानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी या वक्तव्यांवर टीका केली होती. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला दीडशे वर्षे पूर्ण होत आहे. या कार्यक्रमप्रसंगी भुजबळ यांनी वरील वक्तव्य केले होते. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर देताना म्हणाले कि, सरस्वतीचे फोटो काढले जाणार नाही, कोणाला काय वाटेल ते करणार नाही.


अजून बातम्या वाचा..

बाळासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक असलेला कडवट, सच्चा शिवसैनिक गमावला – मुख्यमंत्री शिंदे यांचेकडून शोक व्यक्त

बाळासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक असलेला कडवट, सच्चा शिवसैनिक गमावला – मुख्यमंत्री शिंदे यांचेकडून शोक व्यक्त

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते मनोहर जोशी सरांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दुःख...

read more
🔶 फलक रेखाटन🔶 दि. २३ फेब्रुवारी २०२४ स्वच्छतेचे पुजारी , संत गाडगेबाबा जयंती निमित्त फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन !!

🔶 फलक रेखाटन🔶 दि. २३ फेब्रुवारी २०२४ स्वच्छतेचे पुजारी , संत गाडगेबाबा जयंती निमित्त फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन !!

फलक रेखाटन- देव हिरे.(कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव....

read more
भर बाजारपेठेत झालेल्या चोरी बाबत व्यापारी महासंघातर्फे पोलीस स्टेशनला निवेदन

भर बाजारपेठेत झालेल्या चोरी बाबत व्यापारी महासंघातर्फे पोलीस स्टेशनला निवेदन

मनमाड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या एकात्मता चौक येथील दुकानांमध्ये 21 फेब्रुवारीच्या रात्री...

read more
.