Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

समृद्धी महामार्गावर वाहनांसाठी वेग मर्यादा निश्चित : अधिसूचना जारी

Oct 7, 2022

समृद्धी महामार्गावर वेगमर्यादा 120 किमी राहणार असून यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. महामार्गावरील कमाल वेगमर्यादेसंदर्भात वाहतूक विभाग अप्पर डीजीपींकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तसेच, समृद्धी महार्गावर दुचाकी, चारचाकी रिक्षा अणि तीन चाकी रिक्षा, तसेच तीन चाकी कोणत्याही वाहनांना संचार करण्याची परवानगी नसणार आहे.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरुन जाणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिसूचनेत वेगमर्यादा 120 किमी एवढी निश्चित करण्यात आली आहे. राज्याचे अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) कुलवंत सारंगल यांनी ही अधिसूचना जारी केली आहे.

समृद्धी महामार्गावर वेगमर्यादा नियम :

वाहनचालकासह 8 प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या प्रवासी वाहनांसाठी समतल भागांत 120 कि. मी. प्रति तास तर घाट आणि बोगद्यांमध्ये 100 कि. मी. प्रति तास.
वाहनचालकासह 9 किंवा त्यापेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी समतल भागांत 100 कि. मी. प्रति तास तर घाट आणि बोगद्यांमध्ये 80 कि. मी. प्रति तास.
माल आणि सामानाची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी समतल भागांत 80 कि. मी. प्रति तास तर घाट आणि बोगद्यांमध्ये 80 कि. मी. प्रति तास.
या मार्गावर दुचाकी अणि तीन चाकी रिक्षांसह इतर वाहानांना संचार करण्याची परवानगी नाही.

अजून बातम्या वाचा..

पं.स.नांदगाव व तालुका विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय विज्ञान मेळावा संपन्न

पं.स.नांदगाव व तालुका विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय विज्ञान मेळावा संपन्न

नांदगाव ( सोमनाथ घोंगाणे) पंचायत समिती नांदगाव तसेच तालुका विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त...

read more
गुड शेफर्ड शाळेमध्ये विशाखा समितीच्या वतीने विद्यार्थिनीना शारिरीक स्वछता विषयावर मार्गदर्शन.

गुड शेफर्ड शाळेमध्ये विशाखा समितीच्या वतीने विद्यार्थिनीना शारिरीक स्वछता विषयावर मार्गदर्शन.

मनमाड:- मनमाड येथील गुड शेफर्ड स्कूलमध्ये दिनांक १४/९/२०२२ रोजी विशाखा समितीच्या माध्यमातुन...

read more
मनमाड शहरात कायमस्वरूपी, कार्यकारी दंडाधिकारी तथा मंडल अधिकारी नियुक्त करण्याची भ्रष्ट्राचार विरोधी जन आंदोलन न्यासची जिल्हाधिकार्यांकडे मागणी

मनमाड शहरात कायमस्वरूपी, कार्यकारी दंडाधिकारी तथा मंडल अधिकारी नियुक्त करण्याची भ्रष्ट्राचार विरोधी जन आंदोलन न्यासची जिल्हाधिकार्यांकडे मागणी

मनमाड :- मनमाड शहर हे जिल्ह्यातील तिसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेला मोठे शहर आहे, परंतु...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]