नांदगाव – सोमनाथ घोंगाणे
नांदगाव तालुक्यातील हिसवळ खुर्द येथील सीआरपीफ जवान नवनाथ पुंजाराम आहेर (वय २६ ) यांचा अपघातात मुत्यू
हिसवळ खुर्द येथील सी. आर. पी. एफ जवान नवनाथ आहेर हे मोटार सायकल ने मनमाड येथून हिसवळ येथे जात असताना जोधंळवाडी येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या पुलाला धडक दिल्याने जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली असून हिसवळ गावावर शोककळा पसरली आहे.
मनीपूर येथे सी आर पी एफ मध्ये कार्यरत असलेले नवनाथ आहेर (२६) पंधरा दिवसांच्या सुट्टी वर आलेले होते. शुक्रवार (दि.७) रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास ते मोटार सायकलने मनमाड हुन हिसवळकडे येत असताना जोंधळवाडी जवळ पुलाच्या कठड्यावर जाऊन धडकल्याने जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच गावावर शोककळा पसरली. गेल्या पाच वर्षांपूर्वी ते सैन्यात दाखल झाले होते त्यांच्या पश्चात आई, दोन भाऊ, पत्नी आणि पाच महिन्यांची मुलगी आहे.
सीआरपीफ जवान नवनाथ आहेर यांच्या पार्थीवावर सायंकाळी शोकाकुल वातावरणात नाशिक येथून आलेल्या रॅपिड अँक्शन टीम च्या जवानानीं अखेरची सलामी दिली. १४३ सी. आर . पी . एफ बटालियन च्या कमान अधिकारी यांनी या दु:खद प्रसंगी आम्ही परिवारासोबत आहोत . असा संदेश दिला शेवटी राष्ट्रगीत आणी भारत माता की जय वीर जवान अमर रहे . च्या घोषणा देवून दु:खद अंत:करणाने जवानाला अखेरचा निरोप देण्यात आला .


आ. सुहास कांदे यांच्या वतीने शिवसेना शहरप्रमुख सुनिल जाधव, सागर हिरे, तलाठी आठवले, सर्कल राजपूत, ग्रामसेवक भाबड, ग्रामपंचायत सरपंच कैलास फुलमाळी, उपसरपंच संजय आहेर, नानासाहेब काकळीज यांनी पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी पंचक्रोशीतील हजारो ग्रामस्थ उपस्थित होते.












