शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का देणारी बातमी आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने तात्पुरत्या स्वरुपात गोठवले आहे. शिवसेना हे नावही उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. शिवसेना कोण याचा फैसला निवडणूक आयोगाला करता न आल्यामुळे हा अंतरिम निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण हे चिन्ह वापरता येणार नाही. हा निर्णय तात्पुरत्या स्वरुपाचा असून केवळ आगामी निवडणुकापुरता मर्यादित आहे. हा निर्णय बदलला जाऊ शकतो. आता उद्धव ठाकरे कोणतं चिन्हं निवडणार याची उत्सुकता आहे.

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन
मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...