loader image
[ays_poll id=7]

खा.शरदचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ‘अमृत महोत्सव’ सोहळ्याचे आयोजन

Oct 10, 2022


मुंबई,नाशिक,दि.१० ऑक्टोबर:- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांचा दि.१५ ऑक्टोबर २०२२ रोजी ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. त्या निमित्ताने छगन भुजबळ गौरव समितीच्या वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली दि.१३ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी १.३० वाजता मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात ‘अमृत महोत्सव’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे, अशी माहिती छगन भुजबळ गौरव समितीचे समन्वयक खा.प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे.

छगन भुजबळ गौरव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या अमृत महोत्सवी सोहळ्यास राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत,माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले,जम्मू अँड काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ.फारुख अब्दुल्ला,प्रज्ञावंत लेखक-कवी डॉ.जावेद अख्तर,विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहे.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार हर्षल प्रधान व विजय सावंत यांनी लिहिलेल्या छगन भुजबळ यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. तसेच छगन भुजबळ यांच्या जीवनावर आधारित ७५ निवडक छायाचित्र पुस्तिका-फोटो बायोग्राफीचे देखील मान्यवरांच्या उपस्थित प्रकाशन करण्यात येणार आहे.

या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त राज्यभर सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहेत.यामध्ये विशेषतः सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम राज्यभर घेतले जाणार आहे.

श्री.छगन भुजबळ गौरव समितीमध्ये समन्वयक खा.प्रफुल्ल पटेल यांचेसह काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात,राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,माजी मंत्री दिलीप वळसे- पाटील,खा.सुप्रिया सुळे,आ.कपिल पाटील,आ.सचिन अहिर यांचा समावेश आहे.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ व मनमाड शहर पोलीस स्टेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त गड किल्ले बांधणी स्पर्धा

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ व मनमाड शहर पोलीस स्टेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त गड किल्ले बांधणी स्पर्धा

मनमाड ता ८ : 'चला मग किल्ला बनवूया, मातीशी नाते जोडू या' हे ब्रीद वाक्य घेऊन आगामी शिवजयंती...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इ. १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ आसनव्यवस्था जाहीर

एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इ. १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ आसनव्यवस्था जाहीर

मनमाड : इयत्ता १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2025 केंद्र क्रमांक 0236...

read more
श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी गणेश जयंती उत्सव 2025 निमित्ताने रु.23000/- किंमतीचे ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी गणेश जयंती उत्सव 2025 निमित्ताने रु.23000/- किंमतीचे ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण ,सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मुकुंद आहेर,साईराज परदेशी,तृप्ती पाराशर यांची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

मुकुंद आहेर,साईराज परदेशी,तृप्ती पाराशर यांची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

उत्तराखंड येथे सुरू होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी मनमाडच्या मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश...

read more
.