सोमनाथ घोंगाणे
हिदूं मुस्लीम बांधवा कडून आज शहरातील प्रमुख मार्गावरून शोभायात्रा काढण्यात आली. घोड्यावर चांद असलेला हिरवा झेंडा घेऊन बसलेला स्वार, धार्मिक घोषणा देणारे शिस्तप्रिय भाविक मिरवणुकीचे आकर्षण ठरले.
मिरवणुकीची सुरुवात मौलाना सैफुतुल्ला आणि मौलाना मसूद इल्मी यांनी केली. मिरवणूक मार्गावर राष्ट्र पुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालण्यात आले.
देशात इतरत्र धार्मिक तेढ निर्माण झाली तरी येथे त्याला थारा दिला जात नाही असे सांगतांना येथील मुस्लीम समाजाने उच्च शिक्षण घेऊन प्रगती करावी अशा अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या. यात्रेची सुरूवात मौलाना सैफुतुल्ला आणि मौलाना मसूद इल्मी यांनी केली. मशिदीत कुराणखानी (पठाण) करण्यात आले.
शहरातील हिंदू-मुस्लीम एकोपा, भाईचारा तसेच प्रेम, एकमेकांच्या सणांमध्ये सहभाग या गोष्टी आदर्शवत व उदाहरण म्हणून सगळीकडे अनुकरणीय आहेत असे प्रतिपादन वक्त्यांनी केले.मुस्लीम बांधवांनी केलेल्या आदरातिथ्याने सर्व उपस्थित भारावून गेले
यावेळी माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, संतोष गुप्ता, ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष श्रावण आढाव, सुरजमल संत, रंगनाथ चव्हाण, डॉ सुनील तुसे, जगन्नाथ साळुंके, संजीव धामणे ‘ संजय मोरे ‘ अनील धामणे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सुरवाडकर, पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे, जगताप, संजय सानप ,शहरातील पत्रकारांचा आदींचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
जश्रे ईद-ए-मिलादुनबी इंतेजामिया कमिटीने आयोजन केले होते. अध्यक्ष नासीर खान अलीयार खान, जावेद शेख, माजी नगरसेवक याकुब अब्दल शेख, इक्बाल शेख, अवल सैय्यद, कलीम गफार शेख, शरीफ शेख सम्राट, शाकीर पठाण, एजाज खाटिक, मौसीन खाटिक, जहीर सौदागर, वसीम अजीज शेख, अकिल मास्टर, हाजी फैसल ,उस्मान शेख, आदींनी आयोजन केले. सूत्रसंचालन इस्माईल शेख यांनी केले.
ईदचे औचित्य साधून मुस्लिम युवकांनी येथील शनि चौक मिरवणुकीचे जोरदार स्वागत करून मिठाई वाटप करण्यात आली. तर येथील मूक-बधिर विद्यालयात विद्याथ्यांना मीठाई वाटप करत सण साजरा करण्यात आला. यावेळी मोसीन इफेदार, मुदस्सर शेख, अनवर शेख, अकलाक टीसी, एजाज मोबाईल, शरीफ गनी, प्रितम कासलीवाल, पप्पु फिटर, शिक्षक ज्ञानेश्वर पाटील, सुधिर नागरे उपस्थित होते.