उद्धव ठाकरे गटाला ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव तर मशाल हे चिन्ह मिळाले आहे. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळाले आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांच्य वतीने आज निवडणूक आयोगामध्ये चिन्ह आणि नावासाठी कागदपत्र जमा केली होती. त्यावर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.
दोन्ही गटांच्या नावातील दुसरे पर्याय केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्य केले आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आले असून त्यांना मशाल हे चिन्ह देण्यात आले आहे. तसेच शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आले आहे.