ढोलीला ढोल रे वगाड मारे…तेरे बिना श्याम हमारा नहीं कोई रे…पंखीडा उडी जाना पावा गड रे… या दांडिया-गरबा फेम गीतांसह अनेक रिमिक्स गीतावर लयबद्ध नृत्याविष्कार सादर करत येवल्यातील अनेक महिला व तरुणींनी नवरात्रोत्सवानिमित्त कुणाल दराडे फाउंडेशन आयोजित भव्य दांडिया गरबा स्पर्धेचा नूर अधिकच बहारदार केला.
शहरात प्रथमच अशी स्पर्धा होत असल्याने मोठी उत्सुकता देखील होती.स्पर्धेचे उद्घाटन दीपप्रज्वलन करून करण्यात आले.ज्येष्ठ क्रीडा शिक्षक शिरीष नांदुर्डीकर अध्यक्षस्थानी होते तर कुणाल दराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.व्यासपीठावर सुनील शिंदे,दिनेश आव्हाड,नितीन काबरा,विकास गायकवाड,जयवंत खांडेकर,कल्पेश पटेल,दीपक गुप्ता,जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुरेखा दराडे,आशा दराडे,मीना दराडे,प्रियंका काकड,स्त्री रोग तज्ञ डॉ. कविता दराडे,अनिता दराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.उस्फूर्त सहभागामुळे सायंकाळी सहा वाजता सुरू झालेली स्पर्धा रात्री दहा वाजेपर्यंत सुरू होती.
एका मागोमाग एका गाण्यावर होणारा लयबद्ध नृत्याविष्कार आणि सोबतच फुलत गेलेली स्पर्धा यामुळे वेगळेच वातावरण प्रथम शहरात पाहायला मिळाले.अप्रतिम आविष्कार करणाऱ्या राधा मोहिनी ग्रुपने स्पर्धेचे पहिले ११ हजार रुपयांचे बक्षिस पटकावले.दुसऱ्या क्रमांकाचे सात हजार रुपयांचे बक्षीस नवरंग डान्स ग्रुपने तर तिसऱ्या क्रमांकाचे पाच हजार रुपयांचे बक्षीस गुज्जू रॉक्स ग्रुपने पटकावले.याशिवाय कालिका महिला मंडळ,राजवंशसिंग कारडा,राकेश तडवी,रासलीला ग्रुप यांना उत्तेजनार्थ बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.अमृता गुजराथी,पारुल गुजराथी व आश्लेषा गुजराथी यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले.विजेत्यांना कुणाल दराडे तसेच सौ.दराडे व फाउंडेशनच्या सर्व सदस्यांच्या हस्ते रोख रकमेसह चषक देऊन सन्मानित करण्यात आले.