loader image
[ays_poll id=7]

रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. झुनझुनवाला यांची मनमाड क्लब ला भेट

Oct 11, 2022

नागपुर ते नाशिक अशा विस्तृत शाखांचे जाळे असलेल्या रोटरी क्लब चे डिस्ट्रीक्ट चे गव्हर्नर प्रख्यात डॉ.आनंद झूनझूनवाला यांनी नुकतीच मनमाड रोटरी क्लबला ॲाफ़िशल भेट दिली. मनमाड शहराच्या विविध समस्या जाणुन घेत पुढील काळात मनमाड शहराचे महत्व लक्षात घेता पाण्याचे नियोजन करण्यासाठी रेन वॅाटर हार्वेस्टींग करण्याचे आवाहन करण्यात आले. रोटरी मार्फ़त मनमाड़ मध्ये सिग्नेचर प्रोजेक्ट आयोजन करण्याचे सुचविण्यात आले.
रोटरी क्लब मार्फत आजवर करण्यात आलेले कामे व पुढील कार्यक्रम जाहीर करण्यात आले. मनमाड मधील इंजीनियर असोसिएशन चे जिल्हाअध्यक्ष मुराद शेख यांच्यातर्फे रोटरी क्लब च्या कार्यक्रमांना दुजोरा देण्यात आला.
डॉ.बागरेचा, रोटरी आय हॅास्पिटल मालेगाव व आनंद धर्मार्थ दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने दरमहिन्याच्या पहिल्या मंगळवारी घेण्यात येत असणारा आय चेकअप व कॅटरॅक्ट सर्जरी कॅंप चे काम वाखाणण्यात आले.
डी ज़ी डॉ.आनंद झूनझूनवाला व टीम चे स्वागत वड व पिंपळाचे रोपटे देऊन करण्यात आले. सदर प्रसंगी डिस्ट्रिक्ट सेक्रेटेरी रोटे.राकेशजी डिड़वानिया, असिस्टंट गर्व्हनर रोटे.शिवनारायण काकाणी, डिस्ट्रिक्ट जॅाईंट सेक्रेटेरी रोटे.लौकुमार माने,प्रेसिडेंट रोटे.स्वप्निल सुर्यवंशी,सेक्रेटरी डॉ.सुमित शर्मा सहित मनमाड़ रोटरी क्लब मेंबेर्स, महिला क्लब मेंबेर्स, समाजातील विविध मान्यवर आदि उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी.

  मनमाड :-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेना...

read more
रोटरी क्लब मनमाड तर्फे पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

रोटरी क्लब मनमाड तर्फे पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे रोटरी क्लब मनमाड व मनमाड शहरातील नामांकित...

read more
मनमाड महाविद्यालयात ‘मराठी वाचन कट्टा’ सुरु  व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे आवश्यक आहे  – प्राचार्य डॉ. अरुण पाटील

मनमाड महाविद्यालयात ‘मराठी वाचन कट्टा’ सुरु व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे आवश्यक आहे – प्राचार्य डॉ. अरुण पाटील

  मनमाड (नाशिक) – महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात...

read more
पौष मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 17/01/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

पौष मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 17/01/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
स्वराज्याच्या शिल्पकार राजमाता जिजाऊ यांची जयंती सकल मराठा समाज तर्फे राजमाता जिजामाता चौक येथे मोठ्या उत्साहात संपन्न…

स्वराज्याच्या शिल्पकार राजमाता जिजाऊ यांची जयंती सकल मराठा समाज तर्फे राजमाता जिजामाता चौक येथे मोठ्या उत्साहात संपन्न…

  राजमाता जिजामाता चौक (विवेकानंद नगर )मनमाड येथे स्वराज्य जननी, स्वराज्य संकल्पक,राष्ट्रमाता...

read more
.