सोमवारी शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मिळाले त्यानंतर आज निवडणूक आयोगाने त्यांना ढाल तलवार हे चिन्ह दिल आहे. याबाबतच शिंदे गटाचे प्रवक्ते भरत गोगावले यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की, ”आम्हाला एकदम योग्य चिन्ह मिळालं आहे.” ते म्हणाले की, ”ढालीने जनतेचं रक्षण करायचं आणि कोणी अंगावर आलं तर तलवार समोर धरायची. ढाल आणि तलवार गेल्या अनेक वर्षांपासून शिवाजी महाराजांच्या काळापासून असून ही चांगली बाब आहे आमच्यासाठी.”

मनमाड महाविद्यालयात जागतिक पर्यावरण आरोग्य दिन साजरा
मनमाड: दरवर्षी २६ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यावरण आरोग्य दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून...