loader image

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे ज्ञानार्जना साठीचे समर्पण युवावर्गाल दिशा देणारे : प्रा.शुभम निघुट मुक्ती महोत्सव २०२२ चा उत्साहात प्रारंभ

Oct 12, 2022

येवला –
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जगातील सर्वच धर्म ग्रंथाचा अभ्यास करून सत्यशोधकी वृत्तीनेच बुद्धाच्या धम्माचा स्वीकार केला असून अठरा ते वीस घंटे सातत्याने विद्याभ्यास करत डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे ज्ञानार्जना साठी जे समर्पण केले व जगाने ज्ञानाचे प्रतीक म्हणून त्यांचे कर्तृत्व स्वीकारणे हे भारतीयांसाठी अभिमानास्पद असून बाबासाहेबांचे ज्ञानार्जना साठीचे समर्पण आजही युवावर्गाल दिशा देणारे असल्याचे उदगार प्रा.शुभम निघुट यांनी काढले.

मुक्ती महोत्सव समिती,मुक्तीभूमी येवलाच्या वतीने ८७ व्या धर्मांतर घोषणा वर्धापन दिनानिमित्त मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह येवला येथे आयोजित स्पर्धा परीक्षा संधी व तयारी या विषयावर व्याख्यान प्रसंगी निघुट बोलत होते.
ग्रामीण, कष्टकरी, शेतकरी,शेतमजूरांच्या मुलांनी स्पर्धा परीक्षा अभ्यास तंत्र,नियोजन,व्यवस्थापन नीट आत्मसात करून उच्च अधिकार पदाच्या जागा मिळवल्या पाहिजे व त्या साठी अभ्यासातील सातत्य चिकाटी व झपाटलेपण येण्या करता छत्रपती शिवाजी महाराज यांचे युद्ध कौशल्य तथा व्यवस्थापन नजरेत ठेऊन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रमाणे ज्ञानार्जनाची गोडी स्वतःला लावावी असे निघुट म्हणाले.
भारतीय संविधान आणि बुद्ध व त्यांचा धम्म यातून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली मानवी मूल्य-सन्मानाची मांडणी लोकशाही,समता,स्वातंत्र्य, न्याय,बंधुता,धर्मनिरपेक्ष ता,राष्ट्रवाद,राष्ट्रीय एकता-एकात्मता भारतीय संविधानिक मूल्य विचार नीट समजून घेऊन राष्ट्र उभारणीत युवकांनी प्रथम राष्ट्र व नंतर धर्म ह्या तत्वाचा अंगीकार करावा असे मत ह्यावेळी मुक्ती महोत्सवाचे निमंत्रक,प्रवर्तक शरद शेजवळ यांनी प्रस्ताविकेत सांगितले.
मुक्ती महोत्सवाचे उदघाटन वसतिगृह अधीक्षक ज्ञानेश्वर लोखंडे यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते सुरेश खळे (मामा) होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन,आभारप्रदर्शन राजरत्न वाहुळ यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वसतिगृह कर्मचारी निलेश शेटे प्रवीण थोरात नितीन आभाळे,सुमित गरुड, ललित भांबेरे, साहिल जाधव यांनी परिश्रम घेतले

अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.