मनमाड हुन जवळच असलेल्या चांदवड तालुक्यातील कातरवाडी येथील शेतकरी कुटुंबातील सोपान बाबुराव झाल्टे वय ४० वर्षे
हे काल रात्री त्यांच्या राहत्या घरात पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेले असताना अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या हल्ल्यासमयी सोपान झालटे चे वडील बाबुराव महादू झाल्टे हे सुध्दा गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने नाशिक येथे हलविण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच मनमाड उपविभागीय अप्पर पोलीस अधीक्षक समीर सिंग साळवे व चांदवडचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला.
याप्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात मनीषा सोपान झाल्टे यांच्या तक्रारीवरून अज्ञातांविरुद्ध भादवी ३०२ आणि ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.