नमस्कार, सर्वांना येणाऱ्या दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. स्वच्छ मनमाड व प्लास्टिक पुनर्वापर योजनेअंतर्गत गेल्या दीड वर्षापासून आपण काम करीत आहोत.या योजनेअंतर्गत प्लास्टिक पिशव्या वेस्टने व प्लास्टिकच्या बारीक-सारीक वस्तू ज्या कचऱ्यात गेल्यामुळे कचऱ्यातून नंतर वेगळ्या काढणे अशक्य होते व जमिनीत मिसळून प्लास्टिक मुळे पर्यावरणाची हानी होते हे टाळण्यासाठी घराघरातून प्लास्टिक पिशव्या, वेस्टने व बारीक वस्तू वेगळ्या जमा करून त्या पुनर्वापरासाठी पाठविण्यात येतात. मनमाडकर नागरिक व्यापारी, दुकानदार या योजनेस सहकार्य करतात. येत्या दिवाळीच्या सणा निमित्ताने घराघरात खरेदी केले जाणारे सामान, किराणा , कपडे ई. प्लास्टिक वेस्टन व प्लास्टिक पिशव्यातून येऊ शकते असे सामान वापरून झाल्यावर निघणारे प्लास्टिक पिशव्या व वेस्टने आपण वेगळे जमा करून ते कचऱ्यात न टाकता आमच्याकडे द्यावे (पल्लवी मंगल कार्यालय मनमाड.)किंवा आम्हास कॉल केल्यास आम्ही ते घेऊन जाऊ या योजनेस सहकार्य करून आपणही पर्यावरण प्रेमी म्हणून सहकार्य करणार आहात या योजनेत सहभागी होणाऱ्यांसाठी दिवाळीनंतर लकी ड्रॉ काढण्यात येऊन प्रत्येकास पर्यावरण प्रेमी म्हणून प्रमाणपत्र देण्यात येईल व प्रथम तीन क्रमांकास बक्षीसे देण्यात येतील.
मो. 94 222 48 830