येवले शहरातील मुख्य नांदगाव रोडला मोठमोठे खड्डे पडून रोड खचल्याने नागरिकांना व वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात अपघातांना सामोरे जावे लागत आहे. येवले शहरातील मध्यवर्ती ठिकाणी हजरत सैय्यद बाबा दर्गाह चौक हिंदुस्थानी मस्जिद मागील बाजूला असलेला मुख्य नगरसूल नांदगाव रोड ते औरंगाबाद हायवे लगत अण्णाभाऊ साठे नगर डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर सुलभ सौचालय, हजरत सैय्यद बाबा दर्गाह शरीफ मार्ग. (नांदगाव रोड ) डी पी रोड या परिसरातील रस्त्यांवर पूर्णपणे खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरशः चाळणी झाल्याने रस्त्याला मोठ – मोठे खड्डे पडले असून सा. बां. विभाग डोळे झाक करीत आहे. गेल्या 25 ते 30 वर्षां पासून लक्ष्मी आई माता मंदिर औरंगाबाद हायवे क्रॉस 40 गाव राज्य मार्ग पूर्ण पणे खड्ड्यात गेल्या मुळे दुचाकी चार चाकी वहाने या मध्ये अपघातात वाढ झालेली आहे.ह्या संपूर्ण परिसरात स्ट्रीट लाईट नसल्यामुळे अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. ह्या संबंधीचे निवेदन जिल्हाधिकारी नाशिक यांच्या कडे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनावर राष्ट्रीय स्वाभिमानी जन संघर्ष विकास आघाडी. येवला शहर व. तालुका स्वाभिमानी सेनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष डॉ. शेरूभाई मोमीन, सोमनाथ रोकडे, अल्ताफ पठाण, आश्रफ मोमीन,हुसेन अन्सारी, शकील अन्सारी,सिद्धीक अन्सारी, सलीम सैय्यद, हमीद बाबा अन्सारी, हुसेन कुरेशी, कचरु जानराव, अकील बाबा, मोबीन मुलतानी,ऐकबाल अन्सारी, मजीद अन्सारी, अरफात मोमीन, सलमान मोमीन, गणेश लुलेकर, जाहीद खान, रिजवान अन्सारी,फहीम शेख, शकील शाह आदींसह सदस्य कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षर्या आहे.ह्या मार्गावरील खड्डे त्वरित न बुजवल्यास खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढून वृक्षारोपण व खड्ड्यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येईल याची प्रशासनाने त्वरित नोंद घ्यावी निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधित वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे रवाना करण्यात आले आहेत

मनमाड महाविद्यालयात जागतिक पर्यावरण आरोग्य दिन साजरा
मनमाड: दरवर्षी २६ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यावरण आरोग्य दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून...