loader image

रिल्स बनवल्यामुळे निलंबित केलेल्या लेडी कंडक्टर चे निलंबन मागे ; कामावर रुजू होण्याचे आदेश

Oct 17, 2022


उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब आगारातील निलंबीत करण्यात आलेल्या लेडी कंडक्टरचे निलंबन मागे घेण्यात आले असून या लेडी कंडक्टरला ड्युटीवर असताना रिल्स बनवून इन्स्टाग्रामवर अपलोड करणे चांगलेच महागात पडले होते. याप्रकरणी एसटी महामंडळाने संबंधित महिला कंडक्टरला निलंबित केले होते मात्र आता महामंडळाने हे निलंबन मागे घेतले आहे. मंगल सागर गिरी असे या कंडक्टरचं नाव आहे. गिरी या उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब एसटी आगारात कार्यरत आहेत.

एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन केली म्हणून मंगल गिरी यांच्यावर कारवाई केली होती.

महामंडळाने वाहतूक कंट्रोलरला देखील याच कारणाने निलंबित केले होते.कल्याण कुंभार असं वाहतूक कंट्रोलरचं नाव आहे.

निलंबित महिला कंडक्टरचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. गिरी या वेगवेगळ्या गाण्यावर व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करतात. त्यांचे वेगवेगळे असे व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घातलात. परंतू, गिरी यांनी एसटी महामंडळाचा ड्रेस घालून तुळजाभवानी देवीच्या गाण्यावर व्हिडीओ करुन तो इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाला होता. स्वतःचे व्हिडीओ बनवून एस टी महामंडळाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन झाल्याचं सांगत महांडळाकडून त्यांना निलंबित करण्यात आले होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.