नाशिकच्या अत्यंत संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि सुरक्षेसाठी कटिबद्ध असलेल्या लष्करी विभागातील अधिकारी एसीबीच्या (ACB) जाळयात सापडले आहेत. नाशिक शहरातील गांधीनगर मधील कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या (Cats) आवारात दोन लष्करी अधिकाऱ्यांना लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आल्याची धक्कादायक घटना काल घडली आहे.
नाशिक शहरात लाचखोरीचा पोलीस प्रशासन, मनपा प्रशासन याचबरोबर इतर विभागांपासून ते आता लष्करी विभागात देखील लाचेची घटना समोर आली आहे. नाशिक येथे नव्याने कार्यान्वित झालेल्या सीबीआय (CBI Raid) पथकाने ही कारवाई केली असून या दोघा लष्करी अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल च्या आवारात एका ठेकेदाराकडून एक लाख वीस हजार रुपयांची लाचेची मागणी मेजर हिमांशू मिश्रा कनिष्ठ अभियंता मिलिंद वाडीले यांनी केली रक्कम गुरुवारी संध्याकाळी उशिरा कॅटच्या आवारात स्वीकारत असताना पथकाने त्यांना ताब्यात घेतले आहे. सहाय्यक गिअर्सन इंजिनियर तर वाडिलें हे कनिष्ठ इंजिनियर पदावर असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक रंजीत पांडे यांनी दिली. या दोघांनी ठेकेदारांकडून एका कामाच्या मोबदल्यात एक लाख वीस हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. ही रक्कम दोघांनी कॅट्सच्या आवारात स्वीकारली असता केंद्रीय विभागाच्या नाशिक पथकाने नेत्यांना ताब्यात घेतले.