loader image

कातरवाडी हत्या प्रकरण – तक्रारदार पत्नीसह दोघे पोलिसांच्या ताब्यात

Oct 17, 2022

दोन दिवसांपूर्वी कातरवाडी तालुका चांदवड येथे सोपान बाबुराव झाल्टे यांचा राहत्या घरी अज्ञात लोकांनी हल्ला करून खून केला होता. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोपान बाबुराव झाल्टे वय वर्षे ४० हे त्यांच्या राहत्या घरी रात्री पत्र्याच्या शेड मध्ये झोपले असताना अज्ञात लोकांनी हल्ला करून खून केला होता. या घटनेची माहिती मिळताच मनमाड अप्पर पोलीस अधीक्षक समीर सिंग साळवे व चांदवड पोलीस निरीक्षक समीर बारवकर,पोलीस उपनिरीक्षक सुरेश चौधरी, कर्मचारी मंगेश डोंगरे, उत्तम गोसावी, अमोल जाधव, विजय जाधव, कीर्ती संसारे, पालवे, गुळे, राजेंद्र बिन्नर आदी कर्मचारी व स्थानिक गुन्हे शाखा नासिक यांच्या मदतीने व मालेगाव ग्रामीण पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी व नाशिक ग्रामीण सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कसून तपास करण्यात आला.

तपासात झाल्टे यांच्या पत्नी मनीषा सोपान झाल्टे व तिचे सहकारी सुभाष संसारे (रा. कातरवाडी) व खलील शहा (रा. मनमाड) या तीन संशयितांना चांदवड पोलिसांनी अटक केली आहे.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या...

read more
रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

मनमाड - विज्ञान, तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील संकल्पना खेळण्याच्या (स्वयंचलित...

read more
.