रोजंदारीवर कामाला असलेल्या संजय बहोत या रोजंदारी कर्मचाऱ्याला आरोग्य विभागात आरोग्य निरीक्षक म्हणून चार्ज दिल्याने सदर व्यक्ती मनमानी कारभार करत असल्याने त्याच्या जाचाला अनेक सफाई कामगार वैतागले आहे काम सोडून द्यावे की जीव द्यावा अशी स्थिती निर्माण झाली असून तात्काळ त्याच्या मूळ जागेवर पाठवण्यात यावे अन्यथा सर्व विभागातील स्वच्छतेचे साफसफाईचे काम बंद करण्याचा एल्गार सर्व सफाई कामगारांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे. कर्मचाऱ्यांना त्रास देणाऱ्या या व्यक्तीवर कोणता राजकिय वरदहस्त आहे याची चर्चा शहरात रंगली आहे.
मनमाड नगर पालिकेत रोजंदारी कर्मचारी काम करणारे कर्मचारी संजय बहोत यांची नेमणूक पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी आरोग्य निरीक्षक म्हणून केल्याने कामगार संतप्त झाले आहे सदर व्यक्तीने चार्ज घेतल्यापासून दहशत निर्माण केली असल्याचा आरोप सफाई कर्मचाऱ्यांनी केला आहे सदर व्यक्तीने मनमानी आणि हुकुमशाही पध्दतीने कर्मचारी, कामगारांवर दबाव आणून त्रास देण्याचे काम सुरू केले आहे हा त्रास इतका वाढला आहे की कामगार कामावर जातांना धास्ती धरून जात आहे कामावर गेल्यावर कामगारांना उध्दट भाषेत अरेरावी केली जात असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे कर्मचारी दोन पाच मिनीटे उशिर झाल्यास कामगाराचे खाडे मारले जातात, कामावर घेऊ नका, हजेरी मस्टरचे फोटो काढले जातात जणू कामगारांना कैद्याप्रमाणे वागवले जात असुन या जाचाला कंटाळून काम सोडून द्यावे की जीव द्यावा असा संतप्त भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या आहे. सदर व्यक्तीच्या मागे कोणता राजकीय वरदहस्त आहे याची चर्चा देखील शहरभर रंगली होती. सदर व्यक्ती या पदावर राहिल्यास या व्यक्तींमध्ये आणि सफाई कर्मचाऱ्यांमध्ये मोठा गंभीर प्रकार घडू शकतो त्यामुळे सदर व्यक्तीस त्याच्या रोजंदारीच्या मूळ जागेवर बदली करावी या मागणीसाठी आज मोर्चा काढत प्रशासन अधिकारी अशोक पाईक यांना निवेदन दिले निवेदनावर किशोर आहिरे, सूरज चावरीया, राजेंद्र धिंगाण, संतोष वानखेडे, मटरुलाल चुनियान, श्याम खलसे, सुरेंद्र सिलेलान, मिथुन धिंगाण, बाळू सकट, विजू धिंगाण, अमोल केदारे, यांच्यासह पालिकेच्या आरोग्य विभागातील सर्व सफाई प्रमुख, कायम मुकादम, प्रभाग प्रमुख, मुकादम, सफाई कर्मचारी महिला व पुरुष आदींच्या सह्या आहेत सदर प्रकरणी कार्यवाही न झाल्यास ता १७ पासून शहरातील सर्व प्रभागातील स्वच्छतेचे, साफसफाईचे काम बंद करण्याचा इशारा दिला आहे.

मनमाड महाविद्यालयात जागतिक पर्यावरण आरोग्य दिन साजरा
मनमाड: दरवर्षी २६ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यावरण आरोग्य दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून...