मनमाड शहरात जादा दराने रासायनिक खतांची विक्री केल्याप्रकरणी आठ खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली. रासायनिक खतांची जादा दराने विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागास प्राप्त झाली होती. त्याअनुषंगाने जिल्हास्तरीय भरारी पथकाने मनमाड व परिसरातील तपासणी केली असता तीन खत विक्रेते जादा दराने विक्री करीत असल्याचे आढळून आले. दुकानांचे परवाने निलंबित केल्याची माहिती परवाना अधिकारी, तालुका अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिली आहे.

नाशिक जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेला खेळाडूंचा भरघोस प्रतिसाद
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...