loader image

वाचक प्रेरणा दिन – मनमाड सार्वजनिक वाचनालयात आमदार मिर्झा यांच्या निधीतून २८१ पुस्तकांची ग्रंथ संपदा वाचकांसाठी समर्पित

Oct 17, 2022


मनमाड सार्वजनिक वाचनालयात भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त व वाचक प्रेरणा दिनाच्या औचीत्याने आमदार डॉ वजाहत मिर्झा यांनी मसवा स दिलेली रुपये ९६०००/- ची २८१ पुस्तकांची ग्रंथ संपदा वाचकांना समर्पित
मनमाड शहराचे सांस्कृतीक व सामाजिक वैभव असणाऱ्या आणि शतकोत्तर वाटचाल करणाऱ्या मनमाड सार्वजनिक वाचनालयात भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त सलग आठवा वाचक प्रेरणा दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास मनमाड सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे, सचिव कल्पेश बेदमुथा, संचालक, नरेश गुजराथी, प्रज्ञेश खांदाट व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदे चे सदस्य माननीय आमदार डॉ वजाहत मिर्झा (पुसद जिल्हा यवतमाळ)यांच्या २०२२-२३ स्थानिक विकास निधी तून मनमाड सार्वजनिक वाचनालयाला मिळालेली रुपये ९६०००/- किंमती ची २८१ पुस्तकांची ग्रंथ संपदा डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती व वाचक प्रेरणा दिन औचित्य साधून वाचकांना वाचनासाठी खुली करण्यात आली वाचक संस्कृति ला प्रेरणा मिळावी मनमाड सार्वजनिक वाचनालय अथक प्रयत्नशील आहे वाचकांनी या ग्रंथ संपदेचा लाभ घ्यावा असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे यांनी यावेळी केले. मनमाड सार्वजनिक वाचनालयाचे संचालक नरेश गुजराथी यांनी देखील या प्रसंगी मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिव कल्पेश बेदमुथा यांनी केले. तर या कार्यक्रमास महेश बोराडे ,जनार्दन आहेर , वाचनालयाच्या ग्रंथपाल सौ.संध्या गुजराथी, हेमंत मटकर सौ.नंदिनी फुलभाटी, मच्छिंद्र साळी यांच्यासह वाचकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे संयोजन अध्यक्ष नितीन पांडे व सचिव कल्पेश बेदमुथा यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या...

read more
रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

मनमाड - विज्ञान, तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील संकल्पना खेळण्याच्या (स्वयंचलित...

read more
.