🚩 साक्षात शिव छत्रपतींचा स्पर्श माझ्या कलेला झाला.
मंगळवार ,,,दि.१८ ऑक्टोबर २०२२. हा माझ्यासाठी मंगलमय अविस्मरणीय भाग्याचा दिवस.
लहान पनापासून अनेक थोर महापुरुषांची रेखाटने ,चित्र,रेखाटली व त्याच सोबत अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या शिव छत्रपती, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती संभाजी महाराज ,,यांचे चित्र अनेक वेळा मनापासून अभिमानाने रेखाटली, पण त्यावेळेस कधीही वाटले नव्हते की महाराष्ट्राच्या छत्रपती घराण्याचे वंशज यांची कधी भेट होईल व त्यांचा स्पर्श माझ्या कलेला होईल.
पण असे म्हणतात की जर तुम्ही तुमचे कर्म निरंतर प्रामाणिक करत असाल,कर्तव्या सोबत प्रामाणिक असाल व निस्वार्थ पणे काम करत असाल तर एक दिवस साक्षात देव ही तुम्हाला भेटतोच.
वडनेर भैरव चे आमचे स्नेही श्री.सलादे सर यांनी स्वराज्य संघटन प्रमुख युवराज छत्रपती संभाजी राजे आपल्या चांदवड तालुक्यात वडनेर येथे येणार आहेत असे सांगितले व आपण चांदवड तर्फे राज्याचं स्वागत त्यांचे फलक रेखाटन पोर्ट्रेट करून करावं अशी कल्पना सुचवली. त्यानुसार राज्यांचे पोर्ट्रेट रंगीत खडू ने फळ्यावर साकारले. व त्याची प्रतिमा फ्रेम करून त्यांना साक्षात भेट देण्याचा सुवर्ण योग पण आज आला.
आज साक्षात युवराज छत्रपती संभाजी राजे यांच्या रुपात छत्रपती शिवाजी महाराजच भेटल्याची अनुभूती आली व हे माझं भाग्य आहे असे मी समजतो. कारण राजांनी फलक रेखाटन कलेचे कौतुक ही केले व हे खडूने केलेले फलक चित्र माझ्या संग्रही राहील असे सांगितले. ,,,,,,हा क्षण एका कलावंता साठी व कलेसाठी अहोभाग्यच,,,,!!
साक्षात छत्रपतींचे दर्शन व त्यांचा माझ्या कलेला झालेला स्पर्श हा कलेचा सर्वोच्च सन्मान आहे.
– देव हिरे. (कलाशिक्षक, ‘ शिक्षण मंडळ भगूर ‘संचालित,नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड.जि. नाशिक.)

मनमाड महाविद्यालयातर्फे रक्तदान शिबिर रक्तदान शिबिरात 33 रक्त बॅगचे संकलन
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय,मनमाड येथे रक्तदान...