loader image

राज्य सरकार कडून एस टी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर

Oct 19, 2022


राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचे जाहीर केले आहे. परंतू यावर्षी त्यांच्या बोनसमध्ये वाढ करण्यात आली असल्याची माहीती समोर आली आहे.यासाठी राज्य शासनाकडून 45 कोटी रुपये निधी एसटी महामंडळाला देण्याचा निर्णय झाला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसमध्ये राज्य सरकारकडून वाढ करण्यात आली आहे.
याआधी प्रत्येक वर्षी एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस फक्त अडीच हजार रुपये आणि अधिकाऱ्यांना पाच हजार रुपये भेट दिली जात होती. मात्र आता सरकारच्या आदेशानुसार एसटी महामंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यंदा सरसकट पाच हजार रुपये दिवाळी भेट मिळणार आहे. त्याचबरोबर एसटी कर्मचाऱ्यांना सहा टक्के महागाई भत्ताही मिळणार असल्याचं बोललं जात आहे.
राज्य शासनाने त्यांच्या कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याचे वेतन 21 ऑक्टोबरला अदा करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनाही ऑक्टोबरचे वेतन दिवाळीआधीच देण्याचे आदेश काढण्याची मागणी एसटी महामंडळाकडे केली असल्याचे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितले आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

  मनमाड:-आपल्या नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय,कार्यसम्राट, पाणीदार, क्रीडासम्राट दमदार आमदार...

read more
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून व हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या...

read more
.